यशायाह 44:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 कोणी हे ध्यानात आणत नाही; “त्याचा अर्धा भाग आपण अग्नीत जाळला, त्याच्या निखार्यांवर भाकर भाजली, मांस भाजून खाल्ले आणि त्याच्या अवशेषाची अमंगल वस्तू मी कशी बनवू? झाडापासून काढलेल्या लाकडाच्या पाया मी कसा पडू?” असे म्हणण्याइतके कोणाला ज्ञान नाही, अक्कल नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कोणी विचार करीत नाही किंवा त्यांना नीट समजत नाही ते म्हणतात, मी लाकडाचा एक भाग अग्नीत जाळला; होय, मी त्याच्या निखाऱ्यावर भाकर भाजली. मी त्याच्या निखाऱ्यावर मांस भाजले व खाल्ले. आता त्याच्या दुसऱ्या भागाच्या लाकडाचा आराधनेसाठी काहीतरी ओंगळ बनवू काय? मी लाकडाच्या ठोकळ्याच्या पाया पडू काय? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 कोणीही थांबून विचार करीत नाही, कोणालाही समज नाही व ते जाणून असे म्हणत नाहीत, “अरे! हा तर लाकडाचा ठोकळा आहे; यातील काही भाग मी सरपण म्हणून वापरला, याच्या कोळशावर मी भाकरही भाजली व मांस शिजवून ते खाल्ले. मग यातील अवशिष्ट भागाची मी तिरस्करणीय वस्तू बनवावी काय? मी लाकडाच्या ठोकळ्याला नमन करावे काय?” Faic an caibideil |