Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 44:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ते मनुष्यास सरपणाच्या कामी पडते; त्यातले काही लाकूड घेऊन त्याने तो शेक घेतो; ते पेटवून त्यावर भाकरी भाजतो; तो त्याचा देवही बनवतो व त्याच्या पाया पडतो; तो त्याची कोरीव मूर्ती करतो व तिचे भजनपूजन करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग मनुष्य त्याचा उपयोग सरपणासाठी आणि स्वतःला गरम ठेवण्यासाठी करतो. होय! त्याने अग्नी पेटून आणि भाकर भाजण्यासाठी करतो. मग त्यांपासून देव बनवतो आणि त्याच्या पाया पडतो; तो त्यापासून मूर्ती करतो व त्याच्या पाया पडतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मनुष्य त्याचा उपयोग जळणासाठी करतो; काही लाकूड जाळून स्वतःला ऊब मिळण्यासाठी, आणि आग पेटवून भाकर भाजण्यासाठी. परंतु तो त्या लाकडातून स्वतःसाठी एक देवही निर्माण करतो व त्याची आराधना करतो; तो एक मूर्ती तयार करतो व त्यास नमन करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 44:15
10 Iomraidhean Croise  

अदोम्यांचा संहार करून परत आल्यावर अमस्याने सेईर लोकांची दैवते आणून त्यांना आपले देव मानले आणि तो त्यांची उपासना करू लागला व त्यांच्यापुढे धूप जाळू लागला.


त्यांचा देश मूर्तींनी भरून गेला आहे; ते आपल्या हातांनी घडलेल्या, बोटांनी केलेल्या वस्तूंची पूजा करतात.


हा देव कोणी घडवला? ही मूर्ती कोणी व्यर्थ ओतली?


कोणी आपणासाठी गंधसरू तोडतो; सुरू व अल्लोन झाडे घेतो; तो वनवृक्षांतून जून झाडे निवडतो; तो देवदारूचे झाड लावतो आणि पावसाने ते वाढते.


त्यातले अर्धे लाकूड तो अग्नीत जाळतो; त्या अर्ध्यावर मांस भाजून खातो व तृप्त होतो; तो शेकताना म्हणतो, “मला ऊब येत आहे, मला शेक लागत आहे.”


तो त्याच्या उरलेल्या भागाचा देव घडतो, म्हणजे कोरीव मूर्ती आपल्यासाठी बनवतो; तो तिच्या पाया पडतो, तिचे भजनपूजन करतो; तिची प्रार्थना करतो; तो तिला म्हणतो, “माझे तारण कर, तू माझा देव आहेस.”


“राष्ट्रांतून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या; जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात व उद्धार न करणार्‍या दैवतांची प्रार्थना करतात ते ज्ञानशून्य आहेत.


जे थैलीतून सोने ओततात, जे काट्याने रुपे तोलून देतात, त्यांचे दैवत घडवण्यासाठी ते सोनारास मजुरीने लावतात, ते त्याच्या पाया पडतात, त्याला दंडवत घालतात;


त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी ‘आपल्या हातच्या कृत्यांविषयी’ पश्‍चात्ताप केला नाही; म्हणजे, ‘भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची’ पूजा करणे त्यांनी सोडले नाही;


तरीपण शास्ता मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करत व त्यांच्या चरणी लागून आपल्या वाडवडिलांपेक्षा अधिक बिघडत; ते आपला दुराचार व दुराग्रह सोडत नसत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan