यशायाह 44:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 सुतार सूत धरतो; गेरूने आखणी करतो; तिच्यावर रंधा फिरवतो, व कैवाराने खुणा करतो; आणि ती घरात ठेवण्याजोगी व्हावी म्हणून तिला मनुष्याचा आकार व सौंदर्य देतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 सुतार लाकडाचे माप दोरीने रेष मारून करतो आणि गेरूने आखणी करतो. त्याच्या हत्याराने त्यास आकार देतो आणि कंपासाने त्यावर खुणा करतो. ती पवित्रस्थानात रहावी म्हणून त्यास मनुष्याच्या आकाराची, आकर्षक मनुष्यासारखी घडवून तयार करतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 सुतार लाकडाचा एक ओंडका घेऊन त्याचे मोजपट्टीने माप घेतो आणि त्यावर लेखणीने खुणा करतो; पटाशीने ते तासून गुळगुळीत करतो. कंपासने त्यावर निशाणी करतो. त्याला मानवाच्या शरीराचा आकार देतो, सर्व मानवी गौरवाने अलंकृत करतो, जेणेकरून त्याची मंदिरात स्थापना होऊ शकेल. Faic an caibideil |