Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 43:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मला स्मरण दे, आपण एकमेकांशी वाद करू; तुझे खरे ठरावे म्हणून आपली बाजू सांग.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 जे घडले त्याची मला आठवण दे. आपण परस्पर वाद करू; तू न्यायी सिद्ध व्हावे म्हणून तू आपला वाद पुढे मांड.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 भूतकाळाचे परीक्षण करा, चला, याबद्दल चर्चा करू या; तुम्ही निष्पाप आहा हे सिद्ध करण्यास आपली बाजू मांडा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 43:26
19 Iomraidhean Croise  

तू मला वचन दिले आहेस की, मी तुझे निश्‍चित कल्याण करीन, आणि तुझी संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अगणित करीन.”


ह्यासाठी की त्याने देवाविरुद्ध मनुष्यातर्फे व इष्टमित्रांविरुद्ध मानवपुत्रांतर्फे वाद करावा.


माझी प्रार्थना तुझ्यासमोर धूपाप्रमाणे माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.


हे देवा, ऊठ, तू स्वतःच आपला वाद चालव; मूर्ख तुझी निंदा कशी नित्य करीत आहे हे लक्षात आण.


परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.


अहो द्वीपांनो, माझ्यापुढे गप्प राहा; राष्ट्रे नवीन शक्ती संपादन करोत; ती जवळ येवोत मग बोलोत; निवाडा करण्यास आपण एकत्र जमू.


सर्व राष्ट्रे एकत्र जमोत, लोक एकवटोत; अशा गोष्टी त्यांतला कोण सांगेल? पूर्वी घडलेल्या गोष्टी त्यांनी आम्हांला ऐकवाव्यात; त्यांनी आपले खरे करण्यास साक्षी आणावेत; त्यांनी ते ऐकून म्हणावे की हे खरे आहे.


मला नीतिमान ठरवणारा जवळ आहे; माझ्याबरोबर कोण वाद करणार? आपण समोरासमोर उभे राहू, माझा प्रतिवादी कोण असेल त्याने माझ्यापुढे यावे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, आणखी मी असे करावे म्हणून इस्राएल घराण्यास माझी विनवणी करणे भाग पडेल; कळपाप्रमाणे मी त्यात माणसांची वृद्धी करीन.


परंतु स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?”


त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही स्वत:ला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो; कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे.


कारण त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्त्व स्थापण्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्त्वाला ते वश झाले नाहीत.


“अथवा त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे?”


देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan