Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 43:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तू पैसे देऊन माझ्यासाठी अगरू विकत घेतला नाहीस, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस; तर तू आपल्या पातकांची माझ्यावर सक्ती केलीस, तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिणवलेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तू माझ्यासाठी गोड सुगंधीत ऊस पैका देऊन आणला नाही, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस. पण तू आपल्या पापांचा भार माझ्यावर घातला आहे. तू आपल्या वाईट कृत्यांनी मला श्रमविले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तुम्ही माझ्यासाठी कधी सुगंधी दालचिनी विकत आणली नाही, किंवा भरगच्च चरबीचे यज्ञार्पण केले नाही. उलट, केवळ तुमच्या पातकांचे ओझे मला दिले व तुमच्या अपराधांनी मला शिणविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 43:24
18 Iomraidhean Croise  

चाळीस वर्षे त्या पिढीचा मला वीट आला; मी म्हणालो, “हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत; ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत;”


आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद, ही सर्व समभाग घ्यावीस.


ह्या वेदीवर अहरोनाने सुगंधी द्रव्ययुक्त धूप जाळावा; रोज सकाळी तो तेलवात करील तेव्हा हा धूप त्याने जाळावा.


माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण ह्यांचा द्वेष करतो; त्यांचा मला भार झाला आहे; तो सोसून मी थकलो आहे.


ह्यासाठी प्रभू, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा समर्थ देव म्हणतो, “माझ्या शत्रूंचा समाचार घेऊन मी स्वस्थता पावेन, माझ्या वैर्‍यांचा सूड घेईन.


तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले; तेव्हा तो उलटला व त्यांचा शत्रू बनला, तो स्वत: त्यांच्याशी लढला.


तेव्हा तो म्हणाला, “हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक : तुम्ही मनुष्याला कंटाळा आणता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळवता काय?


तुमच्या कर्माचा दुष्टपणा व तुम्ही केलेली घोर कर्मे ही परमेश्वराला इतःपर सहन होईनात; म्हणूनच तुमचा देश ओसाड, वैराण, शापग्रस्त व निर्जन झाला आहे, हे आज दिसतच आहे.


शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू माझ्याकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलींनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत.


तू आपल्या तरुणपणाच्या दिवसांचे स्मरण ठेवले नाहीस, तर हे सर्व करून मला चिडवलेस, म्हणून पाहा, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझ्या अनाचाराचे प्रतिफळ मी तुझ्या माथी लादीन, म्हणजे आपल्या इतर सर्व अमंगळ कर्मांत आणखी शिंदळकीची भर तू घालणार नाहीस.


तुमच्यापैकी निभावलेले ज्या राष्ट्रांत पकडून नेले जातील त्यांत ते माझे स्मरण करतील; तेव्हा माझ्यापासून दूर झालेले त्यांचे दुराचारी हृदय आणि त्यांनी मूर्तीकडे लावलेले त्यांचे दुराचारी नेत्र मी वठणीस आणीन; त्यांनी आपल्या सर्व अमंगळ कृत्यांनी जे दुष्कर्म केले, त्यामुळे ते आपणांस निंद्य मानतील.


आणि याजकाने वेदीवर त्यांचा होम करावा. हे सुवासिक हव्यान्न होय; कारण चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे.


आणि शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे ह्याचीही सर्व चरबी वेगळी काढून घ्यावी व ती परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून याजकाने तिचा वेदीवर होम करावा; याजकाने त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


ह्यामुळे पाहा, धान्याच्या पेंढ्यांनी गच्च भरलेला गाडा जसा खाली दबतो तसे मी तुम्हांला दाबीन.


आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करतो; असा फसवणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रांत माझ्या नावाची भीती धरतात, असे परमेश्वर म्हणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan