Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 43:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणली नाहीत; आणि मला यज्ञ करून माझे गौरव केले नाही. मी तुझ्यावर अन्नार्पणांसाठी सक्ती केली नाही, धूपासाठी तुला त्रास दिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तू मला होमार्पणासाठी आपल्या मेंढरातील एकही माझ्याकडे आणले नाहीस; किंवा तुझ्या अर्पणाने माझा मान राखला नाहीस. मी तुझ्यावर अन्नार्पणांचा भार घातला नाही आणि तुला धूपार्पणाकरता त्रास दिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 होमार्पणासाठी तुम्ही कोकरे आणली नाहीत. अर्पणे करून तुम्ही माझा सन्मान केला नाही. मी तुम्हाला अन्नार्पणाचे ओझे दिले नाही धूप जाळण्याचा आग्रह करून थकविले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 43:23
19 Iomraidhean Croise  

मला आणखी असे कळले की लेव्यांना वाटे न मिळाल्यामुळे कामावरले लेवी व गायक आपापल्या शेतांवर पळून गेले होते.


आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद, ही सर्व समभाग घ्यावीस.


दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.


दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार?


तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वराचा सन्मान कर;


जो बैल कापतो तो मनुष्यवध करणारा होय; जो मेंढ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान मोडणारा होय; जो अन्नार्पण करतो तो डुकराचे रक्त अर्पण करणारा होय; जो धूप दाखवतो तो मूर्तीचा धन्यवाद करणारा होय; ज्या अर्थी त्यांनी आपलेच मार्ग पसंत केले आहेत व अमंगळ पदार्थांनी त्यांचा जीव संतुष्ट होतो,


सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, “तुमच्या यज्ञबलींत आपल्या होमबलींची भर घाला व मांस खात जा.


तुमच्या पूर्वजांना मी मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवशी होमबलींविषयी किंवा यज्ञबलींविषयी मी त्यांना काही सांगितले नाही व आज्ञा दिली नाही.


कोणाला परमेश्वराप्रीत्यर्थ अन्नार्पण करायचे असल्यास त्याने सपीठ अर्पावे; त्याच्यावर त्याने तेल ओतून वरती धूप ठेवावा.


प्रत्येक रांगेवर शुद्ध धूप ठेव म्हणजे तो त्या भाकरीचे परमेश्वराला स्मरण देणारे हव्य होईल.


हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही रानात चाळीस वर्षे मला पशुयज्ञ व अन्नार्पणे करत होता काय?


“हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळवले? मला उत्तर दे.


मनुष्य देवाला ठकवील काय? तुम्ही तर मला ठकवले आहे; असे असून तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे?’ दशमांश व अर्पणे ह्यासंबंधाने.


कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan