Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 43:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 परमेश्वर, तुमचा उद्धार करणारा, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, “तुमच्यासाठी मी बाबेलास निरोप पाठवला आहे; मी तेथील सर्व खास्द्यांना त्यांच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळायला लावीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 परमेश्वर, तुमचा उद्धारक, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, कारण मी तुझ्यासाठी बाबेलला निरोप पाठवीन आणि त्या सर्वांना खाली फरार करीन, खास्द्यांचे हर्षाचे अविर्भाव विलापगीतात बदलेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर याहवेह असे म्हणतात— “तुमच्याकरिता मी खास्द्यांवर सैन्य पाठवेन आणि सर्व बाबेलच्या लोकांना ज्यांचा त्यांना अत्यंत अभिमान होता, त्या त्यांच्याच जहाजात पलायन करणारे म्हणून मी त्यांना आणेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 43:14
23 Iomraidhean Croise  

मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील;


हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत.


खास्द्यांचा देश पाहा, तो आता राष्ट्र नाही; त्यांची भूमी अश्शूर्‍यांनी वनचरांसाठी सोडली आहे; त्यांनी मोर्चे लावून तिचे महाल जमीनदोस्त करून ती उद्ध्वस्त केली आहे.


हे कीटका, याकोबा, इस्राएलाचे लोकहो, भिऊ नका, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला साहाय्य करतो; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे.


तरी आता हे याकोबा, तुझा उत्पन्नकर्ता, आणि हे इस्राएला, तुझा निर्माणकर्ता परमेश्वर, असे म्हणतो, “भिऊ नको; कारण मी तुला सोडवले आहे; मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे; तू माझा आहेस.


तुझा उद्धारकर्ता, गर्भावस्थेपासून तुला घडणारा परमेश्वर म्हणतो, “मी वस्तुमात्राचा कर्ता परमेश्वर आहे; मी एकट्याने आकाश पसरले, पृथ्वीचा विस्तार केला तेव्हा माझ्याजवळ कोण होते?


इस्राएलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धारकर्ता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो : “मी आदी आहे, मी अंत आहे; माझ्यावेगळा देव नाहीच.


आमच्या उद्धारकर्त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे आहे.


परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो : “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.


हे बहुत जलप्रवाहाजवळ राहणार्‍या, समृद्ध भांडारे असलेल्या, तुझा अंतसमय आला आहे, तुझ्या मिळकतीस आळा बसला आहे.


बाबेल व खास्दी देशाचे सर्व रहिवासी ह्यांनी तुमच्यादेखत जो सर्व अनर्थ सीयोनेत केला आहे त्यांचे मी उसने फेडीन, असे परमेश्वर म्हणतो.


मी आपल्या इस्राएल लोकांत माझे पवित्र नाम प्रकट करीन; ह्यापुढे आपल्या पवित्र नामाची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही; तेव्हा मी परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे असे राष्ट्रांना समजून येईल.


हे सीयोनकन्ये, तुला कापरे भरू दे; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे तुला वेदना होऊ दे; कारण तू आता शहराबाहेर जाशील, शेतात वस्ती करशील व बाबेलपर्यंतही जाशील, तेथे तुझी सुटका होईल. तेथे परमेश्वर तुला तुझ्या वैर्‍यांच्या हातून सोडवील.


ते ‘नवे गीत गाऊन’ म्हणतात : “तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस; कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून 1आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत


Lean sinn:

Sanasan


Sanasan