Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 43:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 “येथून पुढेही मीच तो आहे; माझ्या हातातून कोणाला सोडवून घेता येणार नाही; मी करतो ते कोणाच्याने पालटवणार?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 यादिवसापासून मीच तो आहे, आणि माझ्या हातातून कोणीही सोडवू शकणार नाही. मी कृती करतो आणि ती कोणाच्याने परत बदलू शकेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 सनातनकालापासून मीच परमेश्वर म्हणून अस्तित्वात आहे. माझ्या हातातून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. मी जेव्हा कार्य करतो, त्याला कोणीही उलट करू शकत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 43:13
33 Iomraidhean Croise  

तुला तर ठाऊक आहेच, की मी दुष्ट नाही. तुझ्या हातून सोडवणारा कोणी नाही.


त्याने कोणाला शांतिसमाधान दिले तर त्याला कोण दोष देईल? त्याने तोंड फिरवले तर त्याचे दर्शन कोणाला होईल? हे राष्ट्रासंबंधाने असो की एका व्यक्तीसंबंधाने असो, सारखेच;


तो हिसकावून घेऊ लागला तर त्याचा हात कोण धरील? ‘तू हे काय करतोस,’ असे त्याला कोण म्हणणार?


तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील, त्यांची संतती तुझ्यासमोर स्थायिक होईल.


अहो देवाला विसरणार्‍यांनो, ह्याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हांला फाडून टाकीन, तेव्हा तुम्हांला कोणी सोडवणारा सापडणार नाही.


पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी व जग निर्माण केलेस त्यापूर्वीच अनादि कालापासून अनंतकालापर्यंत तू देव आहेस.


तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे; तू अनादि कालापासून आहेस.


परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली.


सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला आहे तो कोणाच्याने रद्द करवेल! त्याचा हात उगारलेला आहे तर तो कोणाच्याने मागे आणवेल?


हे कार्य कोणी केले? ते शेवटास कोणी नेले? जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणतो त्यानेच. तो मी परमेश्वर आदी आहे व अंती असणार्‍यांनाही तो मीच आहे.


मी आरंभीच शेवट कळवतो. होणार्‍या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे, ‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.’


तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांला वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यांवर वागवून तुमचा बचाव करीन.


तू ज्यांच्यासाठी शिणलीस त्या तुझ्या लोकांची अशी गत झाली आहे; तुझ्या तारुण्यापासून तुझ्याबरोबर व्यापार करणारे भटकत भटकत आपापल्या स्थानी जात आहेत; तुझा बचाव करणारा कोणी नाही.


तुम्ही माझ्याजवळ या, हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तपणे बोललो नाही; ते होऊ लागल्यापासून तेथे मी आहेच.” आणि आता प्रभू परमेश्वराने मला व आपल्या आत्म्याला पाठवले आहे.


कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.


पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.


आता तिच्या वल्लभांसमक्ष तिची लाज उघडी करीन व माझ्या हातून कोणी तिला सोडवणार नाही.


कारण मी एफ्राइमास सिंहासारखा व यहूदाच्या घराण्यास तरुण सिंहासारखा होईन; मी फाडून टाकीन आणि परत जाईन, तो मीच; मी त्याला घेऊन जाईन, आणि सोडवणारा कोणी असणार नाही.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभू, तू अनादि काळापासून आहेस ना? आम्ही मरणार नाही.1 हे परमेश्वरा, तू त्यांचा न्याय नेमला आहेस. हे दुर्गा, त्याचे शासन व्हावे म्हणून तू त्याला स्थापले आहेस.


पाहा, आशीर्वाद देण्याची मला आज्ञा झाली आहे; त्याने आशीर्वादच दिला आहे, तो मला मागे घेता येत नाही.


येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे.”


आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार1 झालो आहोत;


तुझ्यादेखत तुझा बैल कापतील पण त्याचे मांस तुला खायला मिळणार नाही; तुझ्यासमक्ष तुझे गाढव नेतील, पण ते परत तुला मिळणार नाही; तुझी शेरडेमेंढरे तुझ्या शत्रूंच्या हाती लागतील, पण तुला मदत करणारा कोणी असणार नाही.


‘आता पाहा, मी, मीच तो आहे, माझ्याशिवाय कोणी देव नाही; प्राणहरण व प्राणदान करणारा मीच आहे. मी घायाळ करतो आणि मीच बरे करतो; माझ्या हातून सोडवणारा कोणी नाही.


जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा, असा एकच ज्ञानी देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन.


येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे.


मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की, “काही इस्राएली लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”


‘प्रभू देव जो आहे,’ जो होता व जो येणार, ‘जो सर्वसमर्थ,’ तो म्हणतो, “मी अल्फा व ओमेगा आहे.”2


Lean sinn:

Sanasan


Sanasan