यशायाह 42:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणार्यांना जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वर देव हे म्हणत आहे, ज्याने आकाश निर्माण केले आणि त्यास विस्तारीले; ज्याने पृथ्वी पसरली आणि ज्यामध्ये जीवन दिले आहे; तो त्यावरील लोकांस श्वास देतो आणि त्यावर राहणाऱ्यांना जिवन देतो; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परमेश्वर याहवेह हे असे म्हणतात— आकाश निर्माण करून ते विस्तारणारे, पृथ्वीवर सर्वकाही उगविणारे व ते पसरविणारे, ते तिच्यावरील लोकांना श्र्वास प्रदान करतात, आणि जे तिच्यावरून चालतात, त्यांना जीवन प्रदान करतात: Faic an caibideil |
तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस;