Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 42:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मी दीर्घकाळ मौन धरले; मी स्तब्ध राहिलो; मी स्वतःला आवरले; वेणा देणार्‍या स्त्रीप्रमाणे मी आता कण्हत आहे, उसासे व धापा टाकत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 बराच वेळ मी काही बोललो नाही; मी स्तब्ध राहिलो आणि स्वतःवर संयम ठेवला; आता मी प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखा मोठ्याने ओरडेन, मी उसासे व धापा टाकीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “दीर्घकालापासून मी स्तब्ध राहिलो आहे, मी शांत राहून स्वतःला आवर घातला आहे. परंतु आता, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे, मी आक्रोश करेन, धापा टाकेन व माझी दमछाक होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 42:14
16 Iomraidhean Croise  

माझ्या मनात शब्दांची गर्दी झाली आहे. माझा अंतरात्मा मला स्फूर्ती देत आहे.


मी बोललो तरच मला चैन पडेल. मी आपले तोंड उघडीन, उत्तर देईन.


सौंदर्याचा केवळ कळस असा जो सीयोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे.


असे तू केलेस तरी मी उगा राहिलो; मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले; तथापि मी तुझा निषेध करीन. मी तुझी कृत्ये तुझ्यापुढे मांडीन.


ह्यामुळे परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होण्यास विलंब लावील; तुमच्यावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायी देव आहे; जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य.


कोणाला घाबरून, कोणाला भिऊन तू लबाडी केलीस, माझे स्मरण ठेवले नाहीस, परिणामांची पर्वा केली नाहीस? मी दीर्घ काळ स्तब्ध राहिलो, म्हणूनच का तू माझे भय धरले नाहीस?


हे परमेश्वरा, हे पाहून तू आपल्याला आवरशील काय? तू स्तब्ध राहून आम्हांला अशा दुर्धर पीडेत राहू देशील काय?


पाहा, माझ्यासमोर हा लेख आहे; मी पारिपत्य करीपर्यंत उगा राहणार नाही, प्रतिफळ त्यांच्या पदरी मोजून घालीन;


परमेश्वर म्हणतो, तू माझा त्याग केला आहेस; तू मागे फिरली आहेस, म्हणून मी आपला हात तुझ्यावर उगारून तुझा नाश करीन; मी अनुताप करून कंटाळलो आहे.


वेणा देणार्‍या स्त्रीच्या शब्दासारखा शब्द मी ऐकत आहे; प्रथम प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे वेदना ऐकत आहे; सीयोनेच्या कन्येचा स्वर ऐकू येत आहे; ती उसासे टाकत आहे, ती आपले हात पसरत आहे; ती म्हणत आहे, “हाय रे हाय! कारण ह्या मनुष्यघातक्यापुढे माझा जीव घाबरा होत आहे.”


तुमच्या कर्माचा दुष्टपणा व तुम्ही केलेली घोर कर्मे ही परमेश्वराला इतःपर सहन होईनात; म्हणूनच तुमचा देश ओसाड, वैराण, शापग्रस्त व निर्जन झाला आहे, हे आज दिसतच आहे.


तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?


आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हांला असेच लिहिले आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan