Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 42:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 परमेश्वर वीराप्रमाणे निघेल; रणधुरंधराप्रमाणे तो आपल्या आवेशाचे उद्दीपन करील; तो प्रचंड शब्द करील; तो रणशब्द करील; तो आपल्या शत्रूंना आपला प्रभाव दाखवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परमेश्वर शूर योध्द्याप्रमाणे बाहेर जाईल; तो युद्धवीरासारखा पुढे जाईल. तो आपल्या आवेशाने उत्तेजित होईल. तो ओरडेल, होय! तो आपल्या युद्धाची मोठ्याने ओरडून गर्जना करील; तो आपल्या शत्रूंना आपले सामर्थ्य दाखवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 याहवेह एखाद्या लढवय्याप्रमाणे आघाडीवर निघतील, एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते आपला आवेश चेतवतील; ते गर्जना करून युद्धाची नांदी देतील आणि त्यांच्या शत्रूंवर विजयी होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 42:13
19 Iomraidhean Croise  

परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे; परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो.”


तेव्हा प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला. द्राक्षारस पिऊन आरोळी मारणार्‍या वीरासारखा उठला.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


परमेश्वर मला म्हणाला, “जसा सिंह, तरुण सिंह, आपल्या भक्ष्यावर गुरगुरत असता, मेंढरांची टोळी बोलावून त्याच्यावर घातली तरी त्यांच्या आरोळीने घाबरायचा नाही व त्यांच्या गोंगाटाने दबायचा नाही, तसा सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर त्याच्या टेकडीवर लढायला उतरेल.”


कारण यरुशलेमेतून अवशेष निघेल व सीयोन डोंगरातून निभावलेले निघतील; सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


तू स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पाहा; तुझी आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत? तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा माझ्या बाबतीत संकुचित झाली आहे.


ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील; परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायी प्रकट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूंवर होईल.


त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


ह्यास्तव तू त्यांना ह्या सर्व वचनांचा संदेश सांग; त्यांना असे सांग की, ‘परमेश्वर उच्च स्थलावरून गर्जना करील; तो आपल्या पवित्र निवासातून शब्द उच्चारील; तो आपल्या कळपावर गर्जना करील; द्राक्षे तुडवणार्‍यांप्रमाणे तो पृथ्वीच्या सर्व रहिवाशांविरुद्ध आरोळी करील.


ते परमेश्वरामागून जातील, तो सिंहासारखा गर्जेल, तो गर्जेल आणि त्यांचे पुत्र पश्‍चिमेकडून थरथर कापत येतील.


परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो; यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत, तरी परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्राएल लोकांचा दुर्ग आहे.


तो म्हणाला, “परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो, यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, मेंढपाळांची कुरणे शोक करतात व कर्मेलाचा माथा सुकून गेला आहे.”


परमेश्वर ईर्ष्यावान व झडती घेणारा देव आहे; परमेश्वर सूड घेणारा व क्रोधाविष्ट आहे; परमेश्वर आपल्या विरोध्यांचे पारिपत्य करणारा आहे; तो आपल्या शत्रूंविषयी मनात क्रोध वागवतो.


परमेश्वराच्या क्रोधदिनी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील.


परमेश्वर म्हणतो, “मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा. कारण राष्ट्रे एकत्र जमवावीत, राज्ये एकत्र मिळवावीत; त्यांच्यावर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पडावा हा माझा निश्‍चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan