Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 41:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 पाहा, ते सर्व व्यर्थ आहेत, त्यांची कृत्ये निरर्थक आहेत; त्यांच्या ओतीव मूर्ती वायफळ व शून्यवत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 पाहा, त्यातले सर्व काहीच नाहीत, आणि त्यांची कृत्ये काहीच नाहीत; त्यांच्या धातूच्या ओतीव प्रतिमा वारा आणि शून्यवतच आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 पाहा, ती सर्व खोटी आहेत! त्यांची कामे व्यर्थ आहेत; त्यांच्या मूर्ती केवळ वायू असून, त्या गोंधळात टाकणाऱ्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 41:29
16 Iomraidhean Croise  

कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती1 आहेत; परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे.


आपल्या हातांनी बनवलेल्या वेद्यांकडे तो पाहणार नाही; आपल्या बोटांनी घडलेल्या अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती ह्यांकडे तो पाहणार नाही.


त्यांचा देश मूर्तींनी भरून गेला आहे; ते आपल्या हातांनी घडलेल्या, बोटांनी केलेल्या वस्तूंची पूजा करतात.


त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत; कारण ते देव नव्हते, ते मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठपाषाण होते; म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला.


पाहा, तुम्ही काहीच नाही, तुमच्या हातून काहीएक होणे नाही; तुमची निवड करणारा साक्षात अमंगळ होय.


ते त्याला उचलून खांद्यावर घेतात, त्याला नेऊन त्याच्या स्थानी स्थापतात; तेथे तो उभा असतो, आपल्या स्थानावरून हलत नाही; त्याचा धावा केल्यास तो येत नाही, त्यांना संकटांतून तारीत नाही.


विदेश्यांच्या निरुपयोगी दैवतांत कोणी पर्जन्य देणारी आहेत काय? आकाशाला वृष्टी करता येईल काय? हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना? आम्ही तुझी आशा धरतो, कारण तू ह्या सर्वांना उत्पन्न केले आहेस.


संदेष्टे वायुरूप होतील, त्यांच्याकडे संदेश नाही; त्यांची अशी गती होईल.”’


कोरीव मूर्ती ही मूर्तिकाराने कोरून केली ह्यात काय लाभ? खोटा कौल देणार्‍या ओतीव मूर्तीवर मूर्तिकार, मुक्या मूर्ती करणारा, श्रद्धा ठेवतो ह्यात काय लाभ?


कारण तेराफीम3 व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटे दृष्टान्त पाहिले आहेत व फसवणारी स्वप्ने सांगितली आहेत; ते कोरडा धीर देतात; ह्यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांच्यावर जुलूम होत आहे.


तेव्हा देश हेरायला गेलेल्या पाच लोकांनी आत शिरून त्या कोरीव व ओतीव मूर्ती, एफोद व तेराफीम (कुलदेवता) बाहेर आणल्या. त्या वेळेस पुरोहित सहाशे सशस्त्र लोकांसह वेशीच्या दरवाजात उभा राहिला होता.


ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हांला काही लाभ किंवा तुमचा उद्धार होणे शक्य नाही त्यांच्यामागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan