Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 41:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 मीच प्रथम सीयोनेस म्हणालो, “हे पाहा, मी यरुशलेमेसाठी सुवार्तिक नेमला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 मी सियोनेला प्रथम म्हणालो, पाहा, ते येथे आहेत; मी यरूशलेमेकडे अग्रदूत पाठविला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 मीच सीयोनला सर्वप्रथम हे सांगितले, ‘हे पाहा, ते आले आहेत!’ मीच यरुशलेमकडे शुभ संदेश सांगणारा एक निरोप्या पाठविला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 41:27
14 Iomraidhean Croise  

सीयोनेस सुवार्ता सांगणारे,1 उंच डोंगरावर चढ; यरुशलेमेस सुवार्ता सांगणारे,1 आपला स्वर जोराने उंच कर; कर उंच, भिऊ नकोस; यहूदाच्या नगरांना म्हण, “तुमचा देव पाहा.”


हे कार्य कोणी केले? ते शेवटास कोणी नेले? जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणतो त्यानेच. तो मी परमेश्वर आदी आहे व अंती असणार्‍यांनाही तो मीच आहे.


परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “तुम्ही मला ओळखावे, माझ्यावर भाव ठेवावा व मी तोच आहे, माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही हे तुम्हांला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात, तू माझा निवडलेला सेवक आहेस.


मी कोरेशाविषयी म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल.’ तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ‘ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल.”’


इस्राएलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धारकर्ता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो : “मी आदी आहे, मी अंत आहे; माझ्यावेगळा देव नाहीच.


प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की, मीच देव आहे, दुसरा कोणी नव्हे, माझ्यासमान कोणीच नाही.


हे याकोबा, मी बोलवलेल्या इस्राएला, माझे ऐक; मी तोच आहे; मी आदि आहे व अंतही आहे.


“मी मागेच पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या मुखातून त्या निघाल्या, मी त्या कळवल्या; मी त्या अकस्मात करू लागलो, आणि त्या घडून आल्या.


जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, “तुझा देव राज्य करीत आहे” असे सीयोनेस म्हणतो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.


शुभसंदेश असणारा, शांती जाहीर करणारा असा जो, त्याचे पाय पर्वतावर पाहा! हे यहूदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड; कारण ह्यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणारजाणार नाही; त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.


आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? “चांगल्या गोष्टींची (शांतीची) सुवार्ता सांगणार्‍यांचे चरण किती मनोरम आहेत!” असा शास्त्रलेख आहे.


स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिही; जो पहिला व’ शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो :


Lean sinn:

Sanasan


Sanasan