Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 41:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 पाहा, तुम्ही काहीच नाही, तुमच्या हातून काहीएक होणे नाही; तुमची निवड करणारा साक्षात अमंगळ होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 पाहा, तुमच्या मूर्ती आणि तुमचे कृत्ये काहीच नाहीत; जो कोणी तुम्हास निवडतो तो तिरस्करणीय आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 परंतु तुम्ही शून्यते पेक्षाही कमी आहात आणि तुमची कामे पूर्णपणे व्यर्थ आहेत; जो कोणी तुमची निवड करतो, तो धिक्कार-योग्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 41:24
17 Iomraidhean Croise  

त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.


नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे.


कारण परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे.


त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत; कारण ते देव नव्हते, ते मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठपाषाण होते; म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला.


पाहा, ते सर्व व्यर्थ आहेत, त्यांची कृत्ये निरर्थक आहेत; त्यांच्या ओतीव मूर्ती वायफळ व शून्यवत आहेत.


ज्या माणसांनी माझ्याविरुद्ध बंड केले त्यांची प्रेते ते बाहेर जाऊन पाहतील; कारण त्यांना लागलेली कीड कधी मरायची नाही; त्यांना लागलेला अग्नी कधी विझायचा नाही; सर्व मानवजातीस त्यांची किळस येईल.”


प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे; प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे; कारण त्याने ओतलेली मूर्ती साक्षात लबाडी आहे, त्यांच्यात मुळीच प्राण नाही.


त्या शून्य, उपहासाला पात्र वस्तू होत; त्यांचा समाचार घेऊ लागताच त्या नष्ट होतात.


त्या मूर्ती बागेतल्या बुजगावण्यासारख्या आहेत; त्यांना बोलता येत नाही, त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्यांना चालता येत नाही; त्यांना भिऊ नका; कारण त्यांच्याने काही वाईट करवत नाही, व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही.”


ते एकंदर सर्व पशुवत व मूर्ख आहेत; मूर्तीपासून घ्यावयाचा बोध म्हटला म्हणजे काष्ठरूप!


आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की, “जगात (देवाची) म्हणून मूर्तीच नाही;”2 आणि “एकाखेरीज दुसरा देव नाही.”


‘जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ती कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


त्यांच्या देवांच्या कोरीव मूर्ती तुम्ही अग्नीत जाळून टाका; त्यांच्यावरील सोन्यारुप्याचा लोभ धरू नकोस व ते स्वतःकरता ठेवून घेऊ नकोस, घेशील तर त्यामुळे पाशात पडशील; कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.


कोणतीही अमंगळ वस्तू आपल्या घरी आणू नकोस, आणशील तर तूही तिच्याप्रमाणे नाशास पात्र ठरशील; तिचा अगदी वीट मान व तिचा पूर्णपणे अव्हेर कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे.


तिच्या कपाळावर “मोठी बाबेल, कलावंतिणींची1 व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,” हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan