Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 41:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 पाहा, मी तुझे तीक्ष्ण, नवीन व दुधारी असे मळणीचे औत बनवत आहे; तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पाहा, मी तुला नवीन व दुधारी, मळणीच्या घणाप्रमाणे करीत आहे; तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील; तू टेकडयांना भुसांप्रमाणे करशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “पाहा, मी तुम्हाला असे मळणी यंत्र करेन ज्याचे दात नवीन व तीक्ष्ण असतील आणि तुम्ही पर्वतांची मळणी करून त्याचा चुराडा कराल आणि डोंगराचे भुसकट करून त्याची घट कराल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 41:15
20 Iomraidhean Croise  

त्याच्या अंगाचे खालचे भाग तीक्ष्ण धारेच्या खापर्‍यांसारखे आहेत; तो चिखलांवर जसा काय कुळव फिरवतो.


तेव्हा वार्‍याने उडणार्‍या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले; रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना काढून टाकले,


राष्ट्रे महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात; परंतु तो त्या खळबळीस प्रतिरोध करील व ती नाहीशी होईल; डोंगरांवरचे भूस व वावटळीतील धूळ ही वार्‍यापुढे उडून जातात तशी ती नष्ट होईल.


हे माझ्या झोडलेल्या आणि खळ्यातल्या धान्या, इस्राएलाचा देव, सेनाधीश परमेश्वर, ह्याच्याकडून जे मी ऐकले ते मी तुम्हांला कळवले आहे.


ह्यामुळे तो काळ्या जिर्‍यांची मळणी तीक्ष्ण धारेच्या यंत्राने करीत नाही व जिर्‍यावर गाडीचे चाक फिरवत नाही, तर काळे जिरे काठीने व जिरे दांड्याने झोडपतो.


तरी तुझ्या शत्रूंचा समुदाय रजःकणांसारखा होईल, तुला पिडणार्‍यांचा समुदाय उडणार्‍या भुसासारखा होईल; हे एका क्षणात, एकाएकी घडेल.


मी पर्वत व टेकड्या उद्ध्वस्त करीन, त्यांच्यावरचा झाडपाला सुकवीन; नद्यांची बेटे करीन, तळी आटवून टाकीन.


अहाहा! तू आकाश विदारून उतरतास, तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते, तर बरे होते!


तू माझा परशू आहेस, तू माझी युद्धशस्त्रे आहेस; तुझ्या द्वारे मी राष्ट्रे मोडून त्यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे राज्ये नष्ट करीन.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, धान्य मळण्याच्या वेळी खळे असते तशी बाबेलकन्या आहे; अजून थोडा अवधी आहे म्हणजे मग तिचा हंगाम येईल.


मी पर्वतांविषयी आक्रंदन करीन, विलाप करीन, रानातल्या कुरणांबद्दल शोक करीन; कारण ती जळून खाक झाली आहेत; त्यांवरून कोणी चालत नाहीत; तेथे कोणाला गुराढोरांचा शब्द ऐकू येत नाही; जनावरे पळाली आहेत, आकाशातील पक्षी निघून गेले आहेत.


मी हा देश ओसाडी व विस्मय ह्यांचा विषय करीन, त्यांच्या सामर्थ्याचा गर्व जिरेल; इस्राएलाचे पर्वत वैराण होतील, कोणी त्या वाटेने जाणार नाही.


तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने ह्यांचे चूर्ण होऊन उन्हाळखळ्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वार्‍याने ती उधळून नेली; त्यांचा मागमूस राहिला नाही; त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली.


सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; मी तुझे शिंग लोखंडासारखे व तुझे खूर पितळेसारखे करतो; तू अनेक राष्ट्रांचा चुराडा करशील, त्यांची कमाई परमेश्वराला वाहशील, त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाहशील.


वनपशूंत सिंह, मेंढरांत तरुण सिंह गेला असता तो त्यांना तुडवून फाडतो, कोणाच्याने त्यांचे रक्षण करवत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक राष्ट्रांत, बहुत लोकांत होतील.


तू संतापून पृथ्वीवर चालतोस, तू आपल्या क्रोधाने राष्ट्रांना तुडवून टाकतोस,


हे महान पर्वता, तू काय आहेस? जरूब्बाबेलपुढे तू सपाट मैदान होशील; व तो ‘त्यावर अनुग्रह, त्यावर अनुग्रह,’ असा गजर करत कोनशिला पुढे आणील.”


तेव्हा त्यांचा पहाडी देशही तुम्हांला मिळेल. तेथले जंगल तोडा म्हणजे आसपासचा प्रदेश तुमचा होईल. कनानी लोकांजवळ लोखंडी रथ असले व ते बलिष्ठ असले तरी तुम्ही त्यांना हाकून द्याल.”


परमेश्वर त्याला म्हणाला, “खरोखर मी तुझ्याबरोबर असेन; जसे एका माणसाला मारावे तसे एकजात सार्‍या मिद्यानाला तू मारशील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan