Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 41:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तुझ्याशी लढणार्‍यांना तू धुंडाळशील पण ते तुला सापडायचे नाहीत; तुझ्याशी युद्ध करणार्‍यांचा नायनाट होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जे तुझ्याबरोबर भांडण करतात त्यांचा शोध तू करशील आणि तरी ते तुला सापडणार नाहीत. जे तुझ्याविरूद्ध लढाई करतात ते शून्यवत, काहीच नसल्यासारखे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तुम्ही तुमच्या शत्रूचा शोध कराल, पण ते तुम्हाला सापडणार नाहीत. जे तुमच्याविरुद्ध युद्ध करतात त्यांचे अस्तित्वच राहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 41:12
7 Iomraidhean Croise  

संध्याकाळी पाहाल तर थरकाप; पहाट झाली नाही तर तिचा फडशा. जे आम्हांला लुटतात त्यांच्या वाट्याला हे आहे; जे आमचा अपहार करतात त्यांच्या हिश्शाला हे आहे.


कोणी भुकेला स्वप्नात जेवतो आणि जागा होऊन पाहतो तो पोट रितेच; कोणी तहानलेला स्वप्नात पितो आणि जागा होऊन पाहतो तो मूर्च्छित व तहानेने व्याकूळ झालेला; तशीच सीयोन पर्वताविरुद्ध उठलेल्या सर्व राष्ट्रसमूहाची स्थिती होईल.


त्याच्या सरदारांना राजपदासाठी बोलावतील पण कोणी सापडायचा नाही; त्याचे सर्व अधिपती नाहीतसे होतील.


परमेश्वर म्हणतो, “हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील; जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडवण्यात येईल; कारण तुझ्याशी युद्ध करणार्‍याबरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन.


पाहा, त्या समयी तुला पिडणार्‍या सर्वांचा मी समाचार घेईन. जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, हाकून दिलेलीस परत आणीन, अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे त्यांची प्रशंसा व नावलौकिक व्हावा असे मी करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan