Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 40:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 सीयोनेस सुवार्ता सांगणारे,1 उंच डोंगरावर चढ; यरुशलेमेस सुवार्ता सांगणारे,1 आपला स्वर जोराने उंच कर; कर उंच, भिऊ नकोस; यहूदाच्या नगरांना म्हण, “तुमचा देव पाहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 सियोनेस, सुवार्ता घेऊन येणारे जाणारे, उंच डोंगरावर चढ; यरूशलेमेस सुवार्ता सांगणाऱ्ये, आपला आवाज जोराने उंच कर. मोठ्याने आरोळी मार; घाबरू नकोस. यहूदातील नगरांना सांग, येथे तुझा देव आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तुम्ही जे सीयोनसाठी सुवार्ता आणता, उंच डोंगरावर जा. यरुशलेममध्ये सुवार्ता आणणारे तुम्ही, तुमचा आवाज उंचावून आरोळी द्या, आवाज उंच करा, घाबरू नका; यहूदीयाच्या नगरांना सांगा, “तुमचे परमेश्वर येत आहेत!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 40:9
31 Iomraidhean Croise  

अबीया एफ्राइमाच्या डोंगरवटीतल्या समाराईम पहाडावर उभा राहून बोलला, “हे यराबामा, अहो सर्व इस्राएलांनो, माझे ऐका;


यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या काळात यहूदा व यरुशलेम ह्यांविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला झालेला दृष्टान्त.


पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”


त्या दिवशी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव! ह्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. ह्याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.”


ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन ह्यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील.


मीच प्रथम सीयोनेस म्हणालो, “हे पाहा, मी यरुशलेमेसाठी सुवार्तिक नेमला आहे.”


मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेशवचने सिद्धीस नेणारा आहे; मी यरुशलेमेविषयी म्हणतो, ‘तिच्यात वस्ती होवो;’ यहूदाच्या नगरांविषयी म्हणतो, ‘ती बांधण्यात येवोत, त्यांच्या उजाड झालेल्या स्थलांचा जीर्णोद्धार मी करीन;’


“तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे; तू मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस अशी तू कोण?


हे नीती जाणणार्‍यांनो, माझे नियमशास्त्र मनात वागवणार्‍यांनो, तुम्ही माझे ऐका; मर्त्य मानव नावे ठेवतील त्यांना भिऊ नका; त्यांच्या निंदेने घाबरू नका.


म्हणून माझ्या लोकांना माझ्या नामाची ओळख होईल, आणि मग मी तुमच्याजवळ आहे असे बोलणारा तोच मी आहे असे ते त्या दिवशी जाणतील.”


पाहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्या वेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता; तुमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा ह्यासाठी तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही.


प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे; कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे;


“लबानोनावर चढून आक्रोश कर; बाशानात हेल काढून रड; अबारीमाहून आरोळी कर; कारण तुझे सर्व वल्लभ भंगले आहेत.


परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.


शुभसंदेश असणारा, शांती जाहीर करणारा असा जो, त्याचे पाय पर्वतावर पाहा! हे यहूदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड; कारण ह्यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणारजाणार नाही; त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.


आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्‍चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.


तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, “अहो यहूदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या.


तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्‍चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले.


तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा;


पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते. “त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर, व त्यांचे शब्द दिगंतरी पोहचले.”


माझ्यासाठीही विनवणी करा की, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्या-साठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावेत, ह्यासाठी की, जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे.


सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो1 देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.


परंतु नीतिमत्त्वामुळे तुम्हांला दु:ख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. ‘त्यांच्या भयाने भिऊ नका व घाबरू नका’,


हे वर्तमान ऐकून योथाम हा गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर गेला व उभा राहून मोठ्याने म्हणाला, “शखेमकरांनो, माझे ऐका म्हणजे देव तुमचे ऐकेल,


Lean sinn:

Sanasan


Sanasan