Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 40:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 गवत सुकते, फूल कोमेजते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो; लोक खरोखर गवतच आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 गवत सुकते व फुल कोमजते, जेव्हा परमेश्वराच्या श्वासाचा फुंकर त्यावर पडतो; खात्रीने मानवजात गवत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 गवत सुकते आणि फुले गळून पडतात, कारण याहवेहचा श्वास त्यावर फुंकर घालतो. निश्चितच लोक गवत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 40:7
15 Iomraidhean Croise  

तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो; तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही.


देवाच्या श्वासाने ते विलय पावतात, त्याच्या क्रोधाच्या फुंकराने ते नाहीतसे होतात.


त्याच्या श्वासाने कोळसे पेट घेतात; त्याच्या तोंडातून अग्निज्वाला निघते.


माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहे, कारण मला अन्न खाण्याचेही भान राहत नाही.


मानवप्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे; वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो.


वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते, आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही;


तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस; ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत,1 सकाळी उगवणार्‍या गवताप्रमाणे ते आहेत;


सकाळी ते तरारून वाढते; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते.


तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, आणि पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील; तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीला ताडन करील, आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार थकरील.


म्हणून त्यांतील रहिवासी बलहीन झाले, ते भयभीत व फजीत झाले; शेतातील हिरवळ, हिरवे गवत, धाब्यांवरचे गवत, कोवळे शेत ह्यांसारखे ते झाले.


त्यांना लावले न लावले, पेरले न पेरले, त्यांचे मूळ भूमीत रुजले न रुजले, तोच तो त्यांच्यावर फुंकर मात्र घालतो म्हणजे ते सुकून जातात, वादळ त्यांना भुसाप्रमाणे उडवून नेते.


“तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे; तू मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस अशी तू कोण?


तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली, पण हाती थोडे लागले; जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातली; हे का, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करत आहात.


आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा; कारण तो ‘गवताच्या फुलासारखा’ नाहीसा होईल.


सूर्य तीव्र तेजाने उगवला व त्याने ‘गवत कोमेजवले, मग त्याचे फूल गळाले,’ आणि त्याच्या रूपाची शोभा गेली; ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan