Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 40:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 “घोषणा कर!” अशी वाणी ऐकू आली. तेव्हा कोणीएक म्हणाला, “काय घोषणा करू?” सर्व मानवजाती गवत आहे, तिची सर्व शोभा वनातल्या फुलासारखी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 एक वाणी म्हणाली, “घोषणा कर” दुसरे उत्तर आले, “मी काय घोषणा करू?” सर्व देह गवत आहे आणि त्यांचा सर्व विश्वासूपणाचा करार वनातील फुलासारखा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 एक वाणी म्हणाली, “आरोळी द्या.” आणि मी म्हणालो, “मी काय आरोळी देऊ?” “सर्व लोक गवतासारखे आहेत, आणि त्यांचे विश्वासूपण वनातील फुलांसारखे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 40:6
17 Iomraidhean Croise  

तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो; तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही.


माझे दिवस वाढत्या सावलीसारखे झाले आहेत; गवताप्रमाणे मी वाळून गेलो आहे.


दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच.


अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.”


म्हणून त्यांतील रहिवासी बलहीन झाले, ते भयभीत व फजीत झाले; शेतातील हिरवळ, हिरवे गवत, धाब्यांवरचे गवत, कोवळे शेत ह्यांसारखे ते झाले.


घोषणा करणार्‍याची वाणी ऐकू येते की, “अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा.


“तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे; तू मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस अशी तू कोण?


“कंठरव कर, कसर करू नकोस; आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर; माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर.


“जा, हे पुकारून यरुशलेमेच्या कानी पाड : परमेश्वर असे म्हणतो की, तुझे तारुण्यातले प्रेम, वाङ्निश्‍चयाच्या वेळचा तुझा अनुराग व रानात पडीत स्थळी तुझे माझ्यामागून येणे ह्यांचे मला स्मरण आहे.


कारण असा दिवस येत आहे की त्यात एफ्राईम डोंगरावर जागल्ये ओरडून सांगतील, ‘अहो उठा, आपण सीयोनेस आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे जाऊ.”’


गिबात शिंग फुंका, रामात कर्णा वाजवा; तुझ्यामागे, हे बन्यामिना! असा रणशब्द बेथ-आवेन येथे करा.


मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, ‘असे जाहीर कर की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, यरुशलेम व सीयोन ह्यांविषयी मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan