Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 40:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 पण जे कोणी परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते त्यांची नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडासारखे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी गळून जाणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 पण जे याहवेहवर आशा ठेवतात ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात, ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील; ते धावतील पण दमणार नाहीत, ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 40:31
46 Iomraidhean Croise  

तरी नीतिमान आपला मार्ग धरून राहील, निर्मळ हाताच्या मनुष्याला अधिकाधिक शक्ती प्राप्त होईल;


तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो; म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते.


पाहा, जसे दासांचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात.


मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास; तू मला हिम्मत दिलीस तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.


हे परमेश्वरा, तारण कर. आम्ही धावा करतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे.


सात्त्विकपण व सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे.


तुझी कास धरणारा कोणीच फजीत होत नाही! निष्कारण कपट करणारे फजीत होतात.


तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो.


परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.


मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला.


ते अधिकाधिक शक्ती पावत जातात, सीयोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते.


हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक; हे याकोबाच्या देवा, कान दे. (सेला)


परमेश्वराचे उपकारस्मरण करणे, हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे.


जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील.


मी मिसर्‍यांचे काय केले ते व तुम्हांला गरुडाच्या पंखांवर बसवून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे;


गरुडाचे आकाशात उडणे, सर्पाचे खडकावर सरपटणे, जहाजाचे समुद्रावर चालणे, व पुरुषाचा तरुणीशी संबंध.


आपल्या वल्लभावर ओठंगून रानातून येत आहे ही कोण? सफरचंदाच्या झाडाखाली मी तुझे प्रेम जागृत केले; तेथे तुझी माता तुला प्रसवली; तुझ्या जननीला तेथे प्रसववेदना झाल्या.


त्या दिवशी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव! ह्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. ह्याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.”


कारण प्रभू परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणाला, “मागे फिरणे व स्वस्थ राहणे ह्यांत तुमचा बचाव आहे; शांतता व श्रद्धा ह्यांत तुमचे सामर्थ्य आहे.” तरी तसे तुम्ही करीत नाही.


ह्यामुळे परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होण्यास विलंब लावील; तुमच्यावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायी देव आहे; जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य.


अहो द्वीपांनो, माझ्यापुढे गप्प राहा; राष्ट्रे नवीन शक्ती संपादन करोत; ती जवळ येवोत मग बोलोत; निवाडा करण्यास आपण एकत्र जमू.


हे देवा, तुझी आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही.


परमेश्वर याकोबाच्या घराण्यापासून आपले मुख फिरवतो; त्याची वाट मी पाहतो, त्याची आशा धरतो,


मवाब ओसाड झाला आहे, त्याच्या नगरांवर लोक चढाई करून गेले आहेत, त्याचे निवडक तरुण वध पावण्यास खाली उतरून गेले आहेत, असे राजेश्वर म्हणतो; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर.


मी त्यांना परमेश्वराच्या ठायी बलवान करीन; ते त्याच्या नामाने येतील-जातील,” असे परमेश्वर म्हणतो.


त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला.


पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो.


म्हणून आमच्यावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हांला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही.


म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे.


चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.


गरुड पक्षीण आपले कोटे हलवते, आपल्या पिलांवर तळपत असते, आपले1 पंख पसरून त्यांवर त्यांना घेते व आपल्या पंखांवर वाहते,


तुझे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत; तुझे सामर्थ्य आयुष्यभर कायम राहो.’


आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास, तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात, हे ते आपण होऊन आमच्याविषयी सांगतात; त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे.


तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे;


तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा.


मोशेने मला पाठवले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे; लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्या वेळी होती तेवढीच आजही आहे.


त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते; तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक ‘काळ, दोन काळ व अर्धकाळ’ तिचे पोषण व्हायचे होते.


तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस.


‘पहिला प्राणी सिंहा’सारखा, ‘दुसरा गोर्‍ह्या’सारखा, ‘तिसरा माणसाच्या तोंडा’सारखा व ‘चौथा प्राणी उडत्या गरुडा’सारखा होता.


तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला : “हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त ह्या वेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी पलिष्ट्यांचा एका झटक्यात बदला घेईन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan