Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 40:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 त्यांना लावले न लावले, पेरले न पेरले, त्यांचे मूळ भूमीत रुजले न रुजले, तोच तो त्यांच्यावर फुंकर मात्र घालतो म्हणजे ते सुकून जातात, वादळ त्यांना भुसाप्रमाणे उडवून नेते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 पाहा, ते केवळ लावले आहेत; पाहा, ते केवळ पेरले आहेत; पाहा त्यांनी केवळ भूमीत मूळ धरले आहे, तो त्यांच्यापुढे त्यावर फुंकर घालतो आणि ते सुकून जातात व वादळ त्यांना धसकटासारखे उडवून नेते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 लागण करताच, पेरणी करताच, ते जमिनीत मूळ धरू लागते तोच, ते त्यांच्यावर फुंकर घालतात आणि ते कोमेजून जाते, आणि भुशाप्रमाणे वारा ते वाहून नेतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 40:24
28 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराच्या धमकीने, त्याच्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने सागराचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले.


इज्रेल येथे अहाबाच्या घराण्यातील जे लोक उरले होते ते सर्व, त्याचे सर्व थोर पुरुष, जिवलग मित्र व याजक ह्यांचा येहूने वध केला, त्यांतला एकही शेष राहू दिला नाही.”


वार्‍याने जसे धसकट उडते, तुफानाने जसे भूस उडते, तसे ते नष्ट झाले, असे कितीदा घडते?


देवाच्या श्वासाने ते विलय पावतात, त्याच्या क्रोधाच्या फुंकराने ते नाहीतसे होतात.


त्याची मुळे दगडांच्या राशींना वेष्टतात. तो खडकाळ जमिनीत शिरतो.


तुमच्या पातेल्यांना कांटेर्‍या जळणाची आच लागण्यापूर्वीच त्यातले कच्चे असो, शिजलेले असो, ते तो वावटळीने उडवून देईल.


हे माझ्या देवा, वावटळीच्या धुरळ्यासारखे, वार्‍याने उडवलेल्या भुसासारखे त्यांना कर.


वादळाप्रमाणे तुमच्यावर संकट येईल, आणि तुफानाप्रमाणे तुम्हांला विपत्ती प्राप्त होईल; विपत्ती व उद्वेग ही तुमच्यावर ओढवतील.


तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, आणि पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील; तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीला ताडन करील, आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार थकरील.


ती तू लावलीस त्या दिवशी त्यांना तू कुंपण घातलेस व लावलेले बी दुसर्‍या दिवशी सकाळी फुलावे असे केलेस; पण त्याचा हंगाम दुःखाच्या व दुःसह क्लेशाच्या दिवशी केराचा ढीग होईल.


राष्ट्रे महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात; परंतु तो त्या खळबळीस प्रतिरोध करील व ती नाहीशी होईल; डोंगरांवरचे भूस व वावटळीतील धूळ ही वार्‍यापुढे उडून जातात तशी ती नष्ट होईल.


कारण पूर्वीच तोफेत (दहनस्थान) तयार केले आहे; ते राजासाठी सिद्ध केले आहे; ते खोल व रुंद केले आहे; त्याच्या चितेसाठी विस्तव व भरपूर लाकडे आहेत; गंधकाच्या धारेसारखा परमेश्वराचा फुंकर ती पेटवतो.


पाहा, मी त्याला अशी काही प्रेरणा देईन की तो कसली तरी अफवा ऐकून आपल्या देशास परत जाईल व आपल्याच देशात तो तलवारीने पडेल, असे मी करीन.”’


गवत सुकते, फूल कोमेजते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो; लोक खरोखर गवतच आहेत.


तू त्यांना उफणशील, वारा त्यांना उडवून टाकील, वावटळ त्यांना उधळून देईल; आणि तू परमेश्वराच्या ठायी उल्लास पावशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील.


ज्याच्या पावलांना नीतिमत्ता अनुसरते, अशाची उठावणी उगवतीकडून कोणी केली? राष्ट्रे त्याला वश होतील असे तो करतो; राजांवर त्याची सत्ता बसवतो, तो त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या स्वाधीन करतो, व उडणार्‍या धसकटाप्रमाणे त्यांना त्याच्या धनुष्याच्या स्वाधीन करतो.


परमेश्वर म्हणतो, “हे लिहून ठेवा की हा मनुष्य निर्वंश आहे, हा मनुष्य आपल्या सर्व हयातीत उत्कर्ष पावायचा नाही; कारण दाविदाच्या सिंहासनावर बसून यहूदावर राज्य करण्याचे यश त्याच्या वंशातील कोणाला कधी मिळणार नाही.”


पाहा, परमेश्वरापासून त्याचे क्रोधरूप तुफान सुटले आहे; गरगर फिरणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.


तो जरी आपल्या भाऊबंदांत फलद्रूप आहे तरी पूर्वेचा वारा, रानातून परमेश्वराचा वारा येईल आणि त्याची विहीर आटेल, त्याचा झरा सुकून जाईल; तो त्याच्या निधींतील सर्व मनोरम वस्तू हरण करील.


ह्यास्तव ते सकाळच्या अभ्रासारखे, लवकर उडून जाणार्‍या दहिवरासारखे होतील, खळ्यातून वावटळीने उडणार्‍या भुसाप्रमाणे, धुराड्यातून निघणार्‍या धुराप्रमाणे ते होतील.


परमेश्वराने तुझ्याबद्दल अशी आज्ञा केली आहे की, “तुझ्या बीजाची पुन्हा पेरणी होणार नाही; तुझ्या दैवतांच्या मंदिरातून कोरीव व ओतीव मूर्ती मी नष्ट करीन; मी तुझी कबर तयार करीन, कारण तू हलका ठरला आहेस.”


तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली, पण हाती थोडे लागले; जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातली; हे का, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करत आहात.


“जी राष्ट्रे त्यांच्या ओळखीची नाहीत त्यांमध्ये मी त्यांना वावटळीने उडवीन. त्यांच्यामागे त्यांचा देश उजाड झाला आहे; त्यातून कोणी जातयेत नाही; कारण त्यांनी उत्तम भूमी वैराण केली आहे.”


त्यांच्यावरती परमेश्वर दृष्टीस पडेल, त्याचे बाण विद्युल्लतेसारखे सुटतील; प्रभू परमेश्वर रणशिंग फुंकील व दक्षिणेकडच्या वावटळीत कूच करील;


Lean sinn:

Sanasan


Sanasan