Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 40:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तुम्हांला कळत नाही काय? तुम्हांला ऐकू येत नाही काय? प्रारंभापासून तुम्हांला हे कळवले नाही काय? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हांला समजले नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तुम्हास माहीत नाही काय? तुम्ही ऐकले नाही काय? तुम्हास सुरवातीपासून सांगितले नाही काय? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हास समजले नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही ते कधी ऐकले नाही काय? तुम्हाला ते सुरुवातीपासूनच सांगितले नव्हते काय? पृथ्वीची स्थापना होताच तुम्ही ते कधी जाणले नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 40:21
17 Iomraidhean Croise  

प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.


त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरले आहे; त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.


त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.


आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते; देव स्वतः न्याय करणारा आहे. (सेला)


त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


तू ऐकलेस ना? मी हे फार पूर्वीच केले, अगदी प्राचीन काळी योजले असून आता असे घडवून आणले की तुझ्या हातून तटबंदीच्या नगरांचा विध्वंस व नासधूस व्हावी;


तुला कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धी अगम्य आहे.


तो राख भक्षण करतो, त्याचे हृदय मूढ झाल्यामुळे तो बहकला आहे; तो आपला जीव वाचवू शकत नाही; “माझ्या उजव्या हातात आहे ती साक्षात लबाडी नव्हे काय?” असे तो म्हणत नाही.


अहो फितुरी लोकांनो, हे लक्षात आणून दृढ व्हा; हे ध्यानात वागवा.


माझ्याच हाताने पृथ्वीचा पाया घातला; माझ्या उजव्या हाताने आकाश विस्तारले; मी हाक मारताच ती माझ्यापुढे एकत्र उभी राहतात.


आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा परमेश्वर तुझा कर्ता, ह्याला तू का विसरलीस? जुलूम करणारा तुझा नाश करण्यास पाहत आहे म्हणून त्याच्या क्रोधास सारा दिवस एकसारखी का भितेस? जुलम्याचा क्रोध उरला आहे कोठे?


तथापि त्याने स्वत:स साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हांला दिले, आणि अन्नाने व हर्षाने तुम्हांला मन भरून तृप्त केले.”


आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan