Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 40:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 यरुशलेमेच्या मनाला धीर येईल असे बोला, तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे. तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे; परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 यरूशलेमेशी प्रेमळपणाने बोला; आणि तिला घोषणा करून सांगा की तुझे युद्ध संपले आहे, तिच्या अन्यायाची क्षमा झाली आहे, तिने आपल्या सर्व पापांसाठी परमेश्वराच्या हातून दुप्पट स्विकारले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 यरुशलेम बरोबर कोमलपणे बोला, आणि तिला असे घोषित करा की, तिची कठोर सेवा पूर्ण झाली आहे, तिच्या पापाची परतफेड झाली आहे, याहवेहच्या हातातून तिला तिच्या सर्व पापांसाठी दुप्पट मिळाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 40:2
54 Iomraidhean Croise  

याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे मन बसले; त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले.


जे लेवी परमेश्वराच्या सेवेत प्रवीण होते त्या सर्वांना हिज्कीयाने आश्वासन दिले. ह्या प्रकारे शांत्यर्पणे करीत व आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद करीत त्या पर्वाचे सात दिवस ते उत्सव करीत राहिले.


ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य!


तू आपला सर्व क्रोध आवरला आहेस; तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहेस.


पण तो चोरी करत असता सूर्योदय झाला, तर मारणार्‍यावर खुनाचा दोष येईल. चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे; तो कंगाल असला तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी.


रडण्याचा समय व हसण्याचा समय; शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो;


त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, तुझा मी धन्यवाद करतो, कारण तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप शमला आहे व तू माझे सांत्वन केले आहेस.


ज्या दिवशी तुझी पीडा, चिंता व तुझ्यावर लादलेले कठीण दास्य ह्यांपासून परमेश्वर तुला आराम देईल,


अशा रीतीने याकोबाच्या दोषांचे क्षालन होईल; त्याचे पाप दूर केल्याचे फळ हेच आहे; तो वेद्यांचे सर्व चिरे फुटलेल्या चुनखड्यासारखे करील तेव्हा अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती पुन्हा उभारणार नाहीत.


“मी रोगी आहे” असे एकही रहिवासी म्हणणार नाही; तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात.


घाबर्‍या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील.


मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो; मीच तो, तुझी पातके स्मरत नाही.


तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत; माझ्याकडे फीर, कारण मी तुला उद्धरले आहे.


परमेश्वर म्हणतो, “हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील; जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडवण्यात येईल; कारण तुझ्याशी युद्ध करणार्‍याबरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन.


हे यरुशलेमे, जागी हो, जागी हो, ऊठ; तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन टाकला आहेस; झोकांडे देणारा कटोरा तू प्यालीस, त्यातील थेंबही उरला नाही.


खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले.


आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.


पाहा, तुझ्यावर गर्दी झाली ती माझ्याकडून झाली नाही; तुझ्यावर कोण गर्दी करतो? जो करील तो तुझ्यामुळे पडेल.


तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही; तुझ्यावर आरोप ठेवणार्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.


तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, “पाहा, ह्याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्‍चित्त झाले आहे.”


तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हांला दुप्पट मिळेल; आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतनभागानेच ते आनंद पावतील; असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील; त्यांना सार्वकालिक आनंद प्राप्त होईल.


जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करीन; यरुशलेमेत तुमचे सांत्वन करीन.


प्रथमत: त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप ह्यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यांना देईन; कारण त्यांनी आपल्या प्रेतवत व अमंगळ मूर्तींनी माझा देश भ्रष्ट केला आहे. त्यांनी आपल्या किळसवाण्या वस्तूंनी माझे वतन भरले आहे.”


माझा छळ करणारे फजीत होवोत, मी फजीत न व्हावे; ते घाबरे होवोत, मी घाबरे न व्हावे; त्यांच्यावर विपत्काळ आण; दुप्पट नाशाने त्यांचा नायनाट कर!


परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.


परमेश्वराने आमची नीतिमत्ता प्रसिद्ध केली आहे; चला, परमेश्वर आमचा देव ह्याचे कार्य आपण सीयोनात विदित करू.


हे सीयोनकन्ये, तुझ्या दुष्टाईचे शासन आटोपले आहे; तो तुला आणखी पकडून नेणार नाही; हे अदोमकन्ये, तो तुझ्या दुष्टाईचा समाचार घेईल. तो तुझी पातके उघडकीस आणील.


तेव्हा तुझ्यावरचा माझा संताप मी शांत करीन; तुझ्याविषयीची माझी ईर्ष्या नाहीशी होईल; मी शांत होईन, पुन्हा कोप करणार नाही.


सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील, ते अशासाठी की, त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे; कारण नेमलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापि अवधी आहे.


हे दानिएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव; पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील व ज्ञानवृद्धी होईल.


तो म्हणाला, “हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा; कारण अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत.


त्याने आमच्यावर मोठे अरिष्ट आणले; जी वचने तो आमच्याविरुद्ध व आमचा न्याय करणार्‍या न्यायधीशांविरुद्ध बोलला ती त्याने प्रत्ययास आणून दिली आहेत; यरुशलेमेवर जशी विपत्ती आली तशी सर्व जगावर कधी आली नाही.


मी दानीएल शास्त्रग्रंथावरून समजलो की, यरुशलेमेच्या ओसाड दशेचा काळ पुरा होण्यास सत्तर वर्षे लागतील, असे परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला प्राप्त झाले होते.


ह्यास्तव मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तू मला ‘इशी’ (माझा पती) म्हणशील, ह्यापुढे कधी मला ‘बआली’ (माझा धनी) म्हणणार नाहीस.


कारण हा दृष्टान्त नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करत आहे, तो फसवायचा नाही; त्याला विलंब लागला, तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागायचा नाही.


परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे; इस्राएलाचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे; तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही.


तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्‍या दिव्यदूताला परमेश्वर चांगले व सांत्वनदायक शब्द बोलला.


जी राष्ट्रे स्वस्थ आहेत त्यांच्यावर माझा राग फार पेटला आहे; कारण मी थोडासा रागावलो होतो पण त्यांनी अरिष्ट वाढवले.


आशा धरून राहिलेले बंदिवानहो, दुर्गाकडे परत या; आज मी हे जाहीर करतो की, मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन.


तो त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही.


परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.


‘जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे’ तिला दुप्पट द्या; तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी त्यात ओता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan