Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 40:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 कारागीर मूर्ती ओतून तयार करतो, सोनार तिला सोन्याच्या पत्र्याने मढवतो, तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या घडतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मूर्ती! कारागीराने ओतून केली आहेः सोनार तिला सोन्याने मढवतो आणि तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या ओततो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 एक धातूकाम करणारा ओतीव मूर्ती तयार करतो, आणि सोनार त्याला सोन्याने मढवितो आणि तिची चांदीच्या साखळ्यांनी सजावट करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 40:19
17 Iomraidhean Croise  

राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत, त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत.


त्या बनवणारे व त्याच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.


मनुष्यांनी पुजण्यासाठी केलेल्या सोन्यारुप्यांच्या मूर्ती त्या दिवशी लोक चिचुंद्र्या व वटवाघळे ह्यांच्यापुढे टाकून देतील.


त्यांचा देश मूर्तींनी भरून गेला आहे; ते आपल्या हातांनी घडलेल्या, बोटांनी केलेल्या वस्तूंची पूजा करतात.


तुमच्या रुपेरी कोरीव मूर्तींची मढवणी व तुमच्या सोनेरी ओतीव मूर्तींचा मुलामा तुम्ही अपवित्र लेखाल, एखाद्या अमंगळ वस्तूप्रमाणे त्या तुम्ही दूर फेकून द्याल; “चालती हो,” असे तुम्ही मूर्तीस म्हणाल.


तार्शीशाहून आणलेले रुप्याचे पत्रे व उफाजचे सोने ह्यांचे कारागिराने केलेले, सोनाराच्या हाताने घडलेले काम त्या आहेत, त्यांना निळा, जांभळा पोशाख चढवतात; त्या सगळ्या कुशल कारागिरांच्या हातचे काम होत.


त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने. रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांपासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले.


कारण हेही इस्राएलाकडूनच झाले; कारागिराने ते (वासरू) केले, ते देव नाही; ह्या शोमरोनाच्या वासराचे तुकडे-तुकडे होतील.


त्याने ते पैसे आपल्या आईला परत केले. तेव्हा तिने त्यांतली दोनशे नाणी सोनाराला दिली, आणि त्याने त्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती तयार केली; त्या मूर्ती मीखाच्या घरात ठेवण्यात आल्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan