Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 40:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तुम्ही देवाला कोणती उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तर मग तुम्ही देवाची तुलना कशाशी कराल? तर त्याची तुलना कोणत्या प्रतिमेशी करणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तर मग तुम्ही परमेश्वराची तुलना कोणाबरोबर कराल? तुम्ही कोणत्या प्रतिमेला त्यांची उपमा द्याल?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 40:18
24 Iomraidhean Croise  

देवाच्या भुजासारखा तुझा भुज आहे काय! त्याच्या वाणीप्रमाणे तुला गर्जना करता येते काय?


परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे,


कारण परमेश्वराशी तुलना करता येईल असा आकाशात कोण आहे? देवदूतांमध्ये परमेश्वरासमान कोण आहे?


पवित्र जनांच्या सभेत भीती बाळगण्यास योग्य असा देव तो आहे; त्याच्या सभोवतालच्या सर्वांपेक्षा तो भीतिप्रद आहे.


हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेशा, तुझ्यासारखा समर्थ कोण आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे.


हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?


आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस.


तो म्हणाला, “उद्या.” तेव्हा मोशेने म्हटले, “तुझ्या सांगण्याप्रमाणे होईल, मग तुला कळेल की, आमचा देव परमेश्वर ह्याच्यासारखा दुसरा कोणी नाही.


नाहीतर ह्या खेपेस मी सर्व प्रकारच्या पीडा तुझ्या हृदयावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या प्रजेवर पाठवतो, म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे तुला त्यावरून कळेल.


मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्यांची उपमा मला तुम्ही द्याल असे पवित्र प्रभू म्हणतो.


इस्राएलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धारकर्ता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो : “मी आदी आहे, मी अंत आहे; माझ्यावेगळा देव नाहीच.


माझी कोणाशी तुलना कराल? मला कोणाशी समान लेखाल? माझी कोणाशी बरोबरी कराल की जेणेकरून ते माझ्याशी समान ठरतील?


प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की, मीच देव आहे, दुसरा कोणी नव्हे, माझ्यासमान कोणीच नाही.


हे इस्राएलाच्या घराण्या, परमेश्वर तुम्हांला जे वचन सांगतो, ते ऐका;


जो याकोबाचा वाटा तो त्यांसारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे व इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.


हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीच नाही; तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे.


तुझ्यासमान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस; तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो.


तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये.


हे यशुरूना, देवासमान कोणी नाही, तो तुझ्या साहाय्यासाठी मेघमंडळावर आरूढ होऊन आपल्या प्रतापाने आकाशमार्गाने धाव घेतो.


म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केले त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही,


तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे;


हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे, आणि [स्वतः आमच्या] पापांची शुद्धी केल्यावर तो उर्ध्वलोकी राजवैभवाच्या ‘उजवीकडे बसला.’


परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही; कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच; आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan