Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 40:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 पाहा, त्याच्या हिशोबी राष्ट्रे पोहर्‍यांतल्या जलबिंदूसमान, तराजूतल्या रजासमान आहेत; पाहा, द्वीपेही तो धुळीच्या कणांसारखी उचलतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पाहा, राष्ट्रे बादलीतल्या एका थेंबासमान आहेत आणि तराजूतल्या धुळीच्या कणासारखी मोजली आहे; पाहा तो बेटही धुळीच्या कणासारखे उचलतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 राष्ट्रे ही निश्चितच बादलीतील थेंबासारखी आहेत; त्यांना तराजूवर असलेली धूळ समजले जाते; बेटांना ते असे तोलतात, जणू ते धूलिकण आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 40:15
17 Iomraidhean Croise  

ह्यांनी समुद्रकाठालगत भाषा, कुळे व राष्ट्रे ह्यांपरत्वे निरनिराळे देश वसवले.


जुलूमजबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका; संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका.


मानवप्राणी केवळ वाफ आहेत; ते केवळ मिथ्या आहेत; तराजूत घातले असता ते हलके भरतील; ते सर्व वाफच आहेत.


त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्‍यांदा सोडवील.


राष्ट्रे महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात; परंतु तो त्या खळबळीस प्रतिरोध करील व ती नाहीशी होईल; डोंगरांवरचे भूस व वावटळीतील धूळ ही वार्‍यापुढे उडून जातात तशी ती नष्ट होईल.


मनुष्याचे नावच घेऊ नका; त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यांत आहे; त्याला काय जमेस धरायचे आहे?


तरी तुझ्या शत्रूंचा समुदाय रजःकणांसारखा होईल, तुला पिडणार्‍यांचा समुदाय उडणार्‍या भुसासारखा होईल; हे एका क्षणात, एकाएकी घडेल.


हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे; तिच्यावरील रहिवासी टोळांसमान आहेत; तो आकाश मलमलीप्रमाणे पसरतो, राहण्यासाठी तंबू ताणतात तसे ते तो ताणतो.


द्वीपे पाहून भ्याली, पृथ्वीच्या सीमा हादरल्या, ती जवळ येऊन भिडली.


ज्याच्या-त्याच्या कर्माप्रमाणे तो प्रतिफळ देईल, म्हणजे आपल्या शत्रूंना संताप आणील, आपल्या वैर्‍यांना शासन करील, द्वीपांचे उसने फेडील.


मी त्यांना एक चिन्ह दाखवीन; त्याच्यातून जे वाचतील त्यांना मी तार्शीश, पूल व लूद अशा धनुर्धारी राष्ट्रांकडे पाठवीन; ज्यांनी माझे नाम ऐकले नाही, माझा महिमा पाहिला नाही, अशा तुबाल व यावान ह्या दूरच्या द्वीपांत मी त्यांना पाठवीन; ते अन्य राष्ट्रांत माझा महिमा प्रकट करतील.


तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


नंतर तो आपला मोर्चा द्वीपाकडे फिरवील, व त्यांतली अनेक हस्तगत करील; पण त्याने लावलेला हा काळिमा एक सरदार नाहीसा करील; एवढेच नव्हे तर तो उलट त्यालाच काळिमा लावील.


तुला मनुष्यांतून घालवून देतील; तुझी वस्ती वनपशूंत होईल; तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून सात काळ जातील.”


पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.


परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan