Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्या दिवशी परमेश्वराचा अंकुर शोभिवंत व तेजस्वी होईल; भूमीचे उत्पन्न इस्राएलाच्या बचावलेल्यांना वैभव व शोभा देणारे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्या दिवशी परमेश्वराचे रोपटे सुंदर व गौरवी होईल. इस्राएलात राहणाऱ्याकरिता भूमीचे फळ चविष्ट व आनंददायी होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्या दिवसात, याहवेहची शाखा सुंदर आणि गौरवशाली असेल, त्या भूमीतील पिकांचा इस्राएलातील अवशिष्टांना अभिमान व गौरव वाटेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 4:2
40 Iomraidhean Croise  

भूमीने आपला उपज दिला आहे; देव, आमचा देव, आम्हांला आशीर्वाद देवो.


भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो; त्याची कणसे लबानोनासारखी होवोत. नगरोनगरीचे लोक पृथ्वीवरील गवताप्रमाणे विपुल होवोत.


आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन ह्याच्याकरता पवित्र वस्त्रे तयार कर.


तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, आणि पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील; तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीला ताडन करील, आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार थकरील.


त्या दिवशी यहूदा देशात हे गीत गातील : आमचे नगर तटबंदी केलेले आहे; तारण हेच त्याचे कोट व तट नेमले आहेत.


येणार्‍या दिवसांत याकोब मूळ धरील; इस्राएल फुलेल व त्याला फळे येतील; ते फळांनी भूपृष्ठ भरतील.


तू भूमीत आपले बी पेरशील त्यावर तो पाऊस पाडील; भूमी पीक देईल ते अन्न रसभरीत व सत्त्वपूर्ण असेल; त्या काळी तुझी गुरेढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील.


हे आकाशा, वरून वृष्टी कर; आभाळ नीतिमत्तेचा पाऊस पाडो; पृथ्वी उकलो, तारण आणि नीतिमत्ता ही प्रफुल्लित होवोत; ती एकत्र उगवोत; मी परमेश्वर ह्याचा उत्पन्नकर्ता आहे.


कारण तो त्याच्यापुढे रोपासारखा, रुक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला; त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते.


तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन.


तुझे सर्व लोक नीतिमान होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील; माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील,


कारण भूमी जशी आपले अंकुर उगवते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवेसे करतो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत नीतिमत्ता व कीर्ती अंकुरित करील.


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी दाविदाकरता एक नीतिमान अंकुर उगववीन; तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात न्यायनीतीचा अवलंब करील, असे दिवस येत आहेत.


त्या दिवसांत व त्या समयी दाविदाला नीतिमत्तेचा एक अंकुर फुटेल असे मी करीन, त्या देशात न्याय व नीतिमत्ता चालवील.


यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशास परत जाण्याच्या आशेने मिसर देशात काही दिवस राहिले आहेत व स्वदेशी परत जाऊन राहण्याची फार अपेक्षा करीत आहेत त्यांतला कोणी निभावणार किंवा उरणार नाही. पळून जाणार्‍या लोकांखेरीज त्यांतला कोणीही परत जाणार नाही.”


तलवारीपासून निभावलेले असे अगदी थोडे लोक मिसर देशातून यहूदा देशात परत जातील; आणि जे यहूदाचे सर्व अवशिष्ट लोक मिसर देशात काही दिवस राहण्यास गेले आहेत त्यांना, माझा शब्द खरा ठरतो की त्यांचा खरा ठरतो, हे कळून येईल.


मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करीन, म्हणजे पुनरपि त्यांच्या देशावर दुष्काळ येऊन त्यांचा र्‍हास होणार नाही; त्यांना पुन्हा परराष्ट्रीय लोकांकडून अप्रतिष्ठा सोसावी लागणार नाही.


पण इस्राएलाचे पर्वतहो, तुमच्यावरील वृक्षांना फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्राएल लोकांना फळे द्याल असे लवकरच घडून येईल.


त्यांतले काही निभावतील ते निभावतील, पण ते सगळे खोर्‍यातल्या पारव्यांप्रमाणे डोंगरावर आपल्या अधर्मामुळे घुमत राहतील.


तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल; कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलावले ते बाकी उरलेल्यांत राहतील.


त्या दिवशी असे होईल की, पर्वतावरून नवा द्राक्षारस पाझरेल, टेकड्यांवरून दूध वाहील, व यहूदाचे सर्व ओहोळ पाण्याने भरून वाहतील; परमेश्वराच्या मंदिरातून झरा निघेल तो शिट्टीमाच्या खोर्‍यास पाणी पुरवील.


पण निभावलेले सीयोन डोंगरावर राहतील; तो पवित्रस्थान असा होईल; याकोबाचे घराणे आपल्या वतनाचा ताबा घेईल.


आता हे मुख्य याजका, यहोशवा, तू व तुझ्याबरोबर बसणारे तुझे सोबती, तुम्ही ऐका; ती माणसे चिन्हादाखल आहेत; पाहा, मी माझा सेवक जो ‘कोंब’ त्याला आणतो.


त्याला सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, एक पुरुष, ज्याचे नाव कोंब असे आहे तो आपल्या स्थानी उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील.


त्यांची आबादानी केवढी! त्यांचे सौंदर्य केवढे! धान्य तरुणांना आणि नवा द्राक्षारस तरुणींना धष्टपुष्ट करील.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणार्‍या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांच्यावर दया करीन.


आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.


तुम्ही तर होणार्‍या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.”


शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.


कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.


कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्यांसंबंधाने तुम्हांला कळवले असे नाही; तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan