Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 39:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग त्याने विचारले, “त्यांनी आपल्या घरात काय-काय पाहिले?” हिज्कीयाने म्हटले, “माझ्या घरातले सर्वकाही त्यांनी पाहिले; त्यांना माझ्या भांडागारातले दाखवले नाही असे काहीच नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 यशयाने विचारले, “तुझ्या घरात त्यांनी काय काय पाहिले?” हिज्कीयाने उत्तर दिले, “माझ्या घरातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. मी त्यांना माझ्या सर्व मोलवान वस्तू दाखविल्या नाहीत असे काहीच नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 संदेष्ट्याने विचारले, “त्यांनी तुझ्या राजवाड्यात काय पाहिले?” हिज्कीयाह म्हणाला, “त्यांनी माझ्या राजवाड्यातील सर्वकाही पाहिले. माझ्या खजिन्यांमध्ये असे काहीही राहिले नाही, जे मी त्यांना दाखविले नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 39:4
8 Iomraidhean Croise  

जनसमूहाला भिऊन, कुलीन घराणी मला नावे ठेवतील ह्याचा धाक वाटून मी गपचूप राहिलो व घराबाहेर पडलो नाही, माणसांसारखे1 मी आपल्या अपराधावर झाकण घातले असते, माझे पाप मनातल्या मनात लपवले असते तर,


जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावीस काय? कारण गगनात उडणार्‍या गरुडासारखे पंख धन आपणास लावते.


जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही; जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते.


मग यशया संदेष्ट्याने हिज्कीया राजाकडे येऊन विचारले, “ही माणसे काय म्हणाली? व आपल्याकडे कोठून आली?” हिज्कीयाने उत्तर केले, “ती दूर देशाहून बाबेलहून माझ्याकडे आली होती.”


तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक;


हे माझ्या वनातल्या पर्वता, तुझे वित्त, तुझे सर्व निधी व तुझ्या सर्व सीमांच्या आतील तुझी उच्च स्थाने तुझ्या पापामुळे मी लुटीस जाऊ देईन.


तेव्हा यहोशवा आखानाला म्हणाला, “माझ्या मुला, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला थोर मान; त्याच्यापुढे कबूल कर; तू काय केलेस ते आता मला सांग; माझ्यापासून काही लपवू नकोस.”


जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan