Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 39:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग यशया संदेष्ट्याने हिज्कीया राजाकडे येऊन विचारले, “ही माणसे काय म्हणाली? व आपल्याकडे कोठून आली?” हिज्कीयाने उत्तर केले, “ती दूर देशाहून बाबेलहून माझ्याकडे आली होती.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग यशया संदेष्टा हिज्कीया राजाकडे आला आणि त्यास विचारले, “ही माणसे तुला काय म्हणत होती? ती कोठून आली होती?” हिज्कीया म्हणाला, “ती दूरच्या बाबेल देशातून माझ्याकडे आली होती.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा यशायाह संदेष्टा राजा हिज्कीयाहकडे गेला आणि त्याने विचारले, “ती माणसे काय म्हणाली आणि ती कुठून आली होती?” हिज्कीयाहने उत्तर दिले, “दूरवरील देशातून, ते बाबेलहून माझ्याकडे आले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 39:3
15 Iomraidhean Croise  

मग परमेश्वराने नाथानाला दाविदाकडे पाठवले. तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “एका नगरात दोन माणसे राहत होती; त्यांतला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता.


त्या प्रसंगी हनानी द्रष्टा यहूदाचा राजा आसा ह्याच्याकडे येऊन म्हणाला, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भरवसा ठेवला नाहीस व अरामाच्या राजावर भरवसा ठेवला म्हणून अरामाच्या राजाचे सैन्य तुझ्या हातून सुटून गेले आहे.


तेव्हा हनानी द्रष्ट्याचा पुत्र येहू हा यहोशाफाट राजाला सामोरा जाऊन म्हणाला, “तू दुष्टांचे साहाय्य करावे व परमेश्वराच्या द्वेष्ट्यावर प्रीती करावी काय? ह्यामुळे परमेश्वराचा तुझ्यावर कोप भडकला आहे.


तेव्हा अमस्यावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्याच्याकडे एक संदेष्टा पाठवला; तो त्यांना म्हणाला, “ज्या मूर्तींना आपल्या लोकांस तुझ्या हातातून सोडवता आले नाही त्यांच्या भजनी तू का लागलास?”


त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निरवानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस.”


हिज्कीयास जाऊन सांग की, “तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; पाहा, मी तुझे आयुष्य आणखी पंधरा वर्षे वाढवतो.


मग त्याने विचारले, “त्यांनी आपल्या घरात काय-काय पाहिले?” हिज्कीयाने म्हटले, “माझ्या घरातले सर्वकाही त्यांनी पाहिले; त्यांना माझ्या भांडागारातले दाखवले नाही असे काहीच नाही.”


ती राष्ट्रांना सांगा, पाहा, ती यरुशलेमेस जाहीर करा; “दूर देशातून वेढा घालणारे येत आहेत, यहूदाच्या नगरांसमोर ते ललकारत आहेत.


परमेश्वर म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुमच्यावर दुरून एक राष्ट्र आणतो; ते बळकट व प्राचीन राष्ट्र आहे; तुला त्यांची भाषा माहीत नाही, तुला त्यांचे बोलणे समजणार नाही.


पाहा, दूर देशातून माझ्या लोकांच्या कन्येची आरोळी ऐकू येते की, “सीयोनेत परमेश्वर नाही ना? त्यात तिचा राजा नाही ना?” “त्यांनी आपल्या मूर्तींनी व परक्या खोट्या दैवतांनी मला का चिडवले आहे?”


दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणील; त्याची भाषा तुला समजणार नाही;


ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांना म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करारमदार करा.”


त्यांनी त्याला म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत; त्याची कीर्ती व त्याने मिसर देशात जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan