Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 39:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा त्यांच्यावर हिज्कीयाने खूश होऊन त्यांना आपले अमोल भांडार दाखवले; आपले सोनेरुपे, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सगळे शस्त्रागार, सारांश, आपल्या भांडागारात होते नव्हते ते सगळे त्याने त्यांना दाखवले, त्याच्या घरात व सगळ्या राज्यात त्यांना दाखवायचे काहीएक राहिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 या गोष्टीमुळे हिज्कीयाला आनंद झाला; त्याने आपल्या भांडारातील मोल्यवान वस्तू चांदी, सोने, मसाले, अमूल्य तेल आणि त्याचे शस्त्रगार आणि त्याच्या भांडारात हे सर्व सापडले ते सर्व दाखवले. हिज्कीयाने त्यांना दाखविले नाही असे त्याच्या घरात किंवा त्याच्या सर्व राज्यात काहीच राहिले नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 हिज्कीयाहने राजदूतांचे आनंदाने स्वागत केले आणि त्याच्या भांडारांमध्ये काय आहे ते दाखविले—चांदी, सोने, मसाले, उत्तम जैतुनाचे तेल—त्याचे संपूर्ण शस्त्रागार आणि त्याच्या खजिन्यामध्ये असलेली सर्व संपत्ती. त्याच्या राजवाड्यात किंवा त्याच्या संपूर्ण राज्यात हिज्कीयाहने त्यांना दाखविले नाही असे काहीही नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 39:2
18 Iomraidhean Croise  

तिने राजाला एकशेवीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला एवढी सुगंधी द्रव्ये नजर केली की तेवढी पुन्हा कधी कोठून आली नाहीत.


ह्याखेरीज आणखी सौदागर, देवघेव करणारे व्यापारी, निरनिराळ्या लोकांचे राजे व देशांचे सुभेदार ह्यांच्याकडून सोने येई ते निराळेच.


ती आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून यरुशलेमेस आली. शलमोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्यापुढे बोलली.


येणारा प्रत्येक जण चांदीची व सोन्याची पात्रे, उंची वस्त्रे, शस्त्रे, सुगंधी द्रव्ये, घोडे व खेचरे ह्यांचा नजराणा वर्षानुवर्ष आणत असे.


तेव्हा हिज्कीयाने जासुदांचे ऐकून आपले सर्व भांडार त्यांना दाखवले; आपले रुपे, सोने, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सर्व शस्त्रागार व त्याच्या भांडारात होते नव्हते ते सर्व त्याने दाखवले; हिज्कीयाने दाखवले नाही असे त्याच्या घरात व राज्यात काही नव्हते.


पण हिज्कीयाने आपल्यावर झालेल्या उपकारांची फेड केली नाही; त्याचे हृदय उन्मत्त झाल्यामुळे त्याच्यावर, यहूदावर व यरुशलेमेवर कोप झाला.


हिज्कीयाला बहुत धन व मान मिळाला; त्याने सोने, रुपे, रत्ने, सुगंधी द्रव्ये, ढाली व नाना प्रकारची चांगली पात्रे ह्यांसाठी भांडारे बनवली.


तरीपण बाबेलच्या अधिपतींनी देशात घडलेल्या चमत्काराविषयी चौकशी करण्यास वकील पाठवले, तेव्हा त्याची पारख करावी व त्याच्या मनात काय आहे ते जाणावे म्हणून देवाने त्याला सोडून दिले.


शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी बरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून कूटप्रश्‍नांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी यरुशलेमेस आली. शलमोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्यापुढे बोलली.


तिने राजाला एकशे वीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला जी सुगंधी द्रव्ये नजर केली त्यांच्यासारखी पुन्हा कधी कोठून आली नाहीत.


जर माझे धन बहुत आहे, माझ्या हातांनी फार कमाई केली आहे, ह्याचा मी आनंद केला असता,


सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.


सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा नीतिमान पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.


हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?


प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे.


आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan