Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 38:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 हिज्कीयास जाऊन सांग की, “तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; पाहा, मी तुझे आयुष्य आणखी पंधरा वर्षे वाढवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जा आणि माझ्या लोकांचा पुढारी हिज्कीयाला सांग, परमेश्वर असे म्हणतो, तुझा पूर्वज दाविदाचा, देव म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले. पाहा, मी तुझ्या आयुष्याची पंधरा वर्षे आणखी वाढवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “जा आणि हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 38:5
29 Iomraidhean Croise  

तथापि दाविदाकरता त्याचा देव परमेश्वर ह्याने त्याचा दीप यरुशलेमेत कायम राहू दिला; त्याच्या पश्‍चात् त्याच्या पुत्राची त्याने स्थापना केली; आणि यरुशलेम नगर सुस्थितीत ठेवले;


तर आता हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तुझा सेवक, माझा बाप दावीद ह्याला तू असे वचन दिले होते की तू माझ्यासमोर वागत आलास त्याप्रमाणेच तुझे वंशज आपली चालचलणूक ठेवण्याची खबरदारी घेतील तर माझ्यासमक्ष इस्राएलाच्या राजासनावर बसणार्‍या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा कधीही खुंटायची नाही; त्याला दिलेले हे वचनही तू पुरे कर.


हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली.


तो राज्य करू लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकोणतीस वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव अबी असे होते; ती जखर्‍याची कन्या.


तेव्हा आमोजाचा पुत्र यशया ह्याने हिज्कीयाला सांगून पाठवले की, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो, अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याच्याविषयी तू माझी प्रार्थना केलीस ती मी ऐकली आहे.


आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी तो अल्पवयी असतानाच आपला पूर्वज दावीद ह्याच्या देवाच्या भजनी लागला; बाराव्या वर्षी तो उच्च स्थाने, अशेरा मूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती यहूदा व यरुशलेम ह्यांतून काढून टाकू लागला.


मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे; त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या स्वाधीन आहे; तू त्याच्या आयुष्याची मर्यादा नेमली आहेस, ती त्याला ओलांडता येत नाही;


परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे.


भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो.


हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या धाव्याकडे कान लाव; माझे अश्रू पाहून उगा राहू नकोस; कारण मी आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यापुढे परदेशीय व उपरा आहे.


माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेत; माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत; तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय?


परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे; परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करील.


वधण्याचा समय व बरे करण्याचा समय; मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो;


तेव्हा आमोजाचा पुत्र यशया ह्याने हिज्कीयाला सांगून पाठवले की, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो : ‘अश्शूरी राजा सन्हेरीब ह्याच्यासंबंधाने तू माझी प्रार्थना केली;


तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला तो हा :


तू माझी वाणी ऐकलीस; माझ्या उसाशाला; माझ्या आरोळीला, आपला कान बंद करू नकोस.


ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.’ तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे.”


देवदूताने त्याला म्हटले, “जखर्‍या, भिऊ नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे; तुझी पत्नी अलीशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव.


‘पौला, भिऊ नकोस; तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे; आणि पाहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत.’


तथापि दीनांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले;


कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा ‘मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्‍यांजवळ नेईल; आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan