Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 38:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तो म्हणाला, “हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मर, अशी मी तुला विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तो म्हणाला, “परमेश्वरा, मी आपल्या पूर्ण अंतःकरणाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्यासमोरच चाललो, याची कृपया आठवण कर आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले ते मी करत आलो.” आणि हिज्कीया मोठ्याने रडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “हे याहवेह, मी तुमच्यापुढे कसा विश्वासूपणाने आणि पूर्ण मनोभावे समर्पित होऊन चाललो व नेहमी तुमच्या दृष्टीने योग्य तेच केले, याचे स्मरण करा.” आणि हिज्कीयाह अतिदुःखाने रडू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 38:3
40 Iomraidhean Croise  

अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा.


ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.


त्याने उच्च स्थाने मोडून टाकली नाहीत; तथापि आसाचे मन सार्‍या हयातीत परमेश्वराकडे पूर्णपणे लागलेले होते.


आणि माझ्यासंबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील. ते वचन असे की, जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवील व माझ्यासमोर सत्याने व जिवेभावे चालेल तर इस्राएलाच्या गादीवरील तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही.


त्याचा पूर्वज दावीद ह्याच्या सर्व करणीप्रमाणे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते करी.


हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील.


माझा पुत्र शलमोन ह्याला असे सात्त्विक मन दे की त्याने तुझ्या आज्ञा, तुझे निर्बंध व तुझे नियम पाळून हे सर्वकाही करावे आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे.”


तेव्हा लोकांना फार हर्ष झाला, कारण त्यांनी प्रसन्न होऊन खर्‍या मनाने व स्वेच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ ती अर्पण केली होती; दावीद राजालाही मोठा हर्ष झाला. दावीद परमेश्वराचा धन्यवाद करतो


परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. हा तू मूर्खपणा केलास म्हणून ह्यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.”


परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले, पण ते खर्‍या अंत:करणाने केले नाही.


एज्रा देवाच्या मंदिरापुढे पडून रडत असता व प्रार्थना करून पापांगीकार करत असता इस्राएल स्त्रीपुरुष व मुलेबाळे ह्यांचा मोठा समुदाय त्याच्याजवळ जमा झाला; लोक धायधाय रडत होते.


हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो; मी उपास करून स्वर्गींच्या देवाची प्रार्थना केली की,


हे माझ्या देवा, ह्या कामगिरीबद्दल माझे स्मरण ठेव; माझ्या देवाचे मंदिर व त्यातील उपासना यासंबंधाने चांगली कामे मी केली आहेत, ती पुसून टाकू नकोस.


मग मी लेव्यांना आज्ञा केली की, ‘शब्बाथ दिवस पवित्र मानून पाळावा म्हणून तुम्ही शुद्ध होऊन वेशीवर पहारा करण्यास येत जा.’ हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझ्या ह्याही कामगिरीचे स्मरण ठेव, आणि तुझ्या विपुल दयेस अनुसरून माझा बचाव कर.


मग लाकडाचे अर्पण व प्रथमउपज आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव.


हे माझ्या देवा, जे काही मी ह्या देशाच्या लोकांसाठी केले त्याचे तू स्मरण करून माझे बरे कर.


मी सुज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन; तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन.


मी भाकरीप्रमाणे राख खाल्ली आहे; व माझ्या पाण्यात माझी आसवे मिसळली आहेत.


मी लज्जित होऊ नये म्हणून माझे चित्त तुझ्या नियमांकडे पूर्णपणे लागू दे.


मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.


तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे; तुझ्या सत्यमार्गाने मी चाललो आहे.


ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!


मी कण्हून कण्हून थकलो आहे, रोज रात्री मी आपले अंथरूण आसवांत पोहवतो; मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो.


अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्यापुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.


तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली.


तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला तो हा :


म्हणजे अर्थात दिव्यदूताबरोबर झगडून तो जय पावला, त्याने रडून देवाची करुणा भाकली. त्याला देवाचे बेथेलास दर्शन झाले, तेथे तो आमच्याबरोबर बोलला म


नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे; ह्याच्या ठायी कपट नाही!”


आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.


परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित व चांगले आहे तेच कर, म्हणजे तुझे कल्याण होईल; आणि जो उत्तम देश देण्याचे वचन परमेश्वराने तुझ्या पूर्वजांना दिले आहे त्यात तुझा प्रवेश होऊन त्याचे वतन तुला मिळेल;


आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली;


कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan