Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 38:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 पाहा, माझ्या बर्‍यासाठीच ही पीडा मला झाली; तू माझा जीव नाशगर्तेतून मायेने उद्धरला; कारण तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 माझ्या भल्यासाठीच या दुःखांचा अनुभव मला आहे. तूच मला नाशाच्या खळग्यातून वाचवले आहेस. कारण माझी सर्व पापे तू मागे फेकली आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 अशा मनोवेदना मी सहन करणे निश्चितच माझ्या भल्याचे होते. तुमच्या प्रेमाखातर तुम्ही मला नाशाच्या गर्तेपासून वाचविले; तुम्ही माझी सर्व पापे तुमच्या पाठीमागे टाकली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 38:17
20 Iomraidhean Croise  

तेव्हा मी म्हणे की, ‘माझ्या घरकुलातच राहून मला मरण येईल, व माझे दिवस वाळूच्या कणांप्रमाणे1 बहुगुणित होतील;


तर देव त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणेल, ‘ह्याचा बचाव कर, ह्याला गर्तेत पडू देऊ नकोस; मला खंड मिळाला आहे.’


दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो; ज्या क्लृप्त्या ते योजतात त्यांतच ते सापडोत.


पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.


तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो;


तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो; तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो;


हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास; गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखलेस.


नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली.


हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी माणसे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत; मी तर तुझ्यावर भाव ठेवीन.


तू आपल्या लोकांच्या अनीतीची क्षमा केली आहेस, त्यांच्या सर्व पापांवर पांघरूण घातले आहेस. (सेला)


कारण माझ्यावर तुझी दया फार आहे; अधोलोकाच्या तळापासून तू माझा जीव उद्धरला आहेस.


आता मी काय सांगू? त्याने मला वचन दिले व त्याप्रमाणे केलेही; माझ्या जिवाच्या पीडेस्तव माझी सर्व वर्षे मी संथपणे क्रमीन.


मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो; मीच तो, तुझी पातके स्मरत नाही.


परमेश्वर म्हणतो, ह्यापुढे कोणी आपल्या शेजार्‍यास, कोणी आपल्या बंधूस, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही.”


मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते; तरी परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धरला आहेस.


माझा जीव माझ्या ठायी व्याकूळ झाला तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले; माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहचली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan