Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 38:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आता मी काय सांगू? त्याने मला वचन दिले व त्याप्रमाणे केलेही; माझ्या जिवाच्या पीडेस्तव माझी सर्व वर्षे मी संथपणे क्रमीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मी काय बोलू? त्याने दोन्ही केले, तो माझ्याशी बोलला आणि त्याने ते केले आहे; मी आपल्या जीवनात हळूहळू चालेल कारण माझ्या जिवाला खूप क्लेश झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 परंतु मी काय बोलू शकतो? ते माझ्याशी बोलले आहेत आणि त्यांनी स्वःताच हे केले आहे. कारण माझ्या या तीव्र मनोवेदनेमुळे माझी सर्व वर्षे मी नम्रपणाने चालेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 38:15
13 Iomraidhean Croise  

एलीयाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपली वस्त्रे फाडली व अंगास गोणपाट गुंडाळून उपवास केला; तो गोणपाटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला.


डोंगर चढून देवाच्या माणसाजवळ आल्यावर तिने त्याचे पाय धरले. गेहजी तिला एकीकडे लोटायला जवळ गेला तेव्हा देवाचा माणूस त्याला म्हणाला, “तिला हात लावू नकोस, तिचे मन व्याकुळ झाले आहे; परमेश्वराने ही गोष्ट माझ्यापासून लपवली आहे, मला कळवली नाही.”


तर आता हे आमच्या देवा, असे असता आम्ही काय बोलणार? आम्ही तुझ्या आज्ञा मोडल्या आहेत.


“माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे; मी आपले गार्‍हाणे एकसारखे चालू ठेवीन; माझ्या जिवाला क्लेश होत आहे म्हणून मी बोलेन.


कोणी सौख्याचा अनुभव न घेता जिवाच्या कष्टदशेत मरतो.


ह्यामुळे मी आपले तोंड आटोपणार नाही; मी आपल्या मनाचा खेद उघड करून सांगेन; माझ्या जिवास क्लेश होतात म्हणून मी गार्‍हाणे करीन.


मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो.


मरणाच्या लागास आलेल्यास मद्य दे, खिन्न मनाच्या मनुष्यास द्राक्षारस दे.


पाहा, माझ्या बर्‍यासाठीच ही पीडा मला झाली; तू माझा जीव नाशगर्तेतून मायेने उद्धरला; कारण तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकली आहेत.


आता माझा जीव व्याकूळ झाला आहे; मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर; परंतु मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे.


हे प्रभो, इस्राएलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखवली; आता मी काय बोलू?


तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan