Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 37:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा यशया त्यांना म्हणाला, “आपल्या धन्याला असे सांगा : ‘परमेश्वर म्हणतो, अश्शूरी राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत, त्यामुळे तू घाबरू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आणि यशया त्यांना म्हणाला, तुझ्या धन्याला सांग; परमेश्वर म्हणतो, अश्शूरी राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा अपमान केला आहे, ते शब्द तू ऐकले आहेस, त्याने तू घाबरून जाऊ नको.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 यशायाह त्यांना म्हणाला, “तुमच्या धन्याला सांगा, ‘याहवेह असे म्हणतात: तुम्ही जे ऐकले आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका—त्या शब्दांनी अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी माझी निंदा केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 37:6
16 Iomraidhean Croise  

मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा, कारण ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत.


घाबर्‍या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील.


ह्याप्रमाणे हिज्कीया राजाचे सेवक यशया ह्याच्याकडे आले.


हे नीती जाणणार्‍यांनो, माझे नियमशास्त्र मनात वागवणार्‍यांनो, तुम्ही माझे ऐका; मर्त्य मानव नावे ठेवतील त्यांना भिऊ नका; त्यांच्या निंदेने घाबरू नका.


आणि त्याला सांग की, ‘सावध हो व शांत राहा; भिऊ नकोस; ह्या दोन कोलितांच्या उरलेल्या धुमसणार्‍या शेपटांमुळे म्हणजे क्रोधाने भडकलेले अरामी रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्यामुळे तुझे मन खचू देऊ नकोस.


तुमच्यातले पाच जण शंभरांना, शंभर जण दहा हजारांना पळवून लावतील आणि तुमचे शत्रू तुमच्यापुढे तलवारीने पडतील.


नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हांला विश्वास कसा नाही?”


परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, सभास्थानाच्या अधिकार्‍याला म्हणाला, “भिऊ नकोस, विश्वास मात्र धर.”


मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नकोस, कारण उद्या मी ह्याच वेळी ते सर्व कापून काढलेले इस्राएलाच्या हाती देईन; त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan