Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 37:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना व याजकांपैकी वडील ह्यांना गोणपाट नेसलेले असे त्याने आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याच्याकडे पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याने एल्याकीम जो घरावर कारभारी होता, आणि शेबना चिटणीस आणि याजकातील वडील यांना गोणपाट घातलेले असे आमोजाचा मुलगा यशया संदेष्ट्याकडे पाठवले, त्या सगळ्यांनी खास शोकप्रदर्शक कपडे घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्याने राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि वडील याजक यांना गोणपाट नेसून आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याकडे पाठविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 37:2
15 Iomraidhean Croise  

त्यांनी राजाला बोलावणे पाठवले तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे त्याच्याकडे गेले.


तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना व याजकांपैकी वृद्ध लोक ह्यांना गोणपाट नेसलेले असे आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याच्याकडे त्याने पाठवले.


ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले; ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, “अहो यहूद्यांनो, अहो यरुशलेमनिवासी जनहो, ऐका; तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.”


हे वर्तमान मर्दखयाच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोणपाट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले;


यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या काळात यहूदा व यरुशलेम ह्यांविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला झालेला दृष्टान्त.


त्या वेळी आमोजाचा पुत्र यशया ह्याच्या द्वारे परमेश्वर म्हणाला : “जा, आपल्या कंबरेचे गोणपाट सोडून टाक, आपल्या पायातला जोडा काढ.” त्याने तसे केले; तो उघडा व अनवाणी चालला.


त्या दिवशी तुम्ही रडावे, शोक करावा, केस तोडावे, गोणपाट नेसावे असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने सांगितले होते;


प्रभू, सेनाधीश परमेश्वर असे म्हणाला की, “जा, राजमहालातील व्यवस्था पाहणारा कारभारी जो शेबना त्याच्याकडे जाऊन असे म्हण :


त्या दिवशी असे होईल की माझा सेवक, हिल्कीयाचा पुत्र एल्याकीम, ह्याला मी बोलावीन;


त्याच्याकडे खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस आसाफाचा पुत्र यवाह हे गेले.


हिज्कीयाने जासुदांच्या हातून ते पत्र घेऊन वाचले; मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरात जाऊन ते परमेश्वरापुढे उघडून ठेवले.


तेव्हा आमोजाचा पुत्र यशया ह्याने हिज्कीयाला सांगून पाठवले की, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो : ‘अश्शूरी राजा सन्हेरीब ह्याच्यासंबंधाने तू माझी प्रार्थना केली;


त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निरवानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस.”


याजकहो, गोणपाट घालून शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा; माझ्या देवाच्या सेवकांनो, या, गोणपाटावर पडून रात्र घालवा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan