Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 37:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत; कारण ते देव नव्हते, ते मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठपाषाण होते; म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्यांनी त्यांचे देव अग्नीत टाकले, कारण ते देव नव्हते परंतु मनुष्यांच्या हाताचे काम होते, फक्त लाकूड व दगड होते, म्हणून अश्शूऱ्यांनी त्यांना नष्ट केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आणि त्यांनी त्यांची दैवते अग्नीत फेकून दिली आहेत, कारण त्या मूर्ती परमेश्वर नव्हत्या. ते तर मनुष्याने घडविलेले लाकूड आणि दगड होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 37:19
25 Iomraidhean Croise  

पलिष्टी तेथे आपल्या मूर्ती टाकून गेले; त्या दाविदाने व त्याच्या लोकांनी नेल्या.


तसेच त्यांनी बनवलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नीत टाकले व कुटून त्याचा चुरा केला; तो त्याने पाण्यावर टाकला. ते पाणी त्याने इस्राएल लोकांना प्यायला लावले.


तथापि त्याचा विचार काही असा नाही, त्याच्या मनाचा समज असा नाही; कारण केवळ नासधूस करावी, बहुत राष्ट्रांची कत्तल करावी हेच त्याच्या मनात आहे.


आपल्या हातांनी बनवलेल्या वेद्यांकडे तो पाहणार नाही; आपल्या बोटांनी घडलेल्या अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती ह्यांकडे तो पाहणार नाही.


त्यांचा देश मूर्तींनी भरून गेला आहे; ते आपल्या हातांनी घडलेल्या, बोटांनी केलेल्या वस्तूंची पूजा करतात.


मृत जिवंत होत नसतात, प्रेते उठत नसतात; तद्वत तू त्यांची झडती घेऊन त्यांचा विध्वंस केला आहेस व त्यांचे स्मरण अगदी नाहीसे केले आहेस.


पाहा, तुम्ही काहीच नाही, तुमच्या हातून काहीएक होणे नाही; तुमची निवड करणारा साक्षात अमंगळ होय.


पाहा, ते सर्व व्यर्थ आहेत, त्यांची कृत्ये निरर्थक आहेत; त्यांच्या ओतीव मूर्ती वायफळ व शून्यवत आहेत.


ओतार्‍याने सोनाराला, हातोड्याने गुळगुळीत करणार्‍याने ऐरणीवर घण मारणार्‍याला, धीर दिला आणि “सांधा चांगला बसला आहे” असे म्हटले व मूर्ती ढळू नये म्हणून त्याने ती खिळ्यांनी मजबूत बसवली.


तो त्याच्या उरलेल्या भागाचा देव घडतो, म्हणजे कोरीव मूर्ती आपल्यासाठी बनवतो; तो तिच्या पाया पडतो, तिचे भजनपूजन करतो; तिची प्रार्थना करतो; तो तिला म्हणतो, “माझे तारण कर, तू माझा देव आहेस.”


त्यांनी मला सोडले आहे, अन्य देवांपुढे धूप जाळला आहे व आपल्या हातच्या कृतींची पूजा केली आहे; त्यांच्या ह्या सर्व दुष्टतेबद्दल मी त्यांना शिक्षा फर्मावीन.


तुम्ही त्यांना हे सांगा की, “ज्या देवांनी आकाश व पृथ्वी केली नाही ते पृथ्वीवरून, आकाशाखालून नष्ट होतील.”


मानव आपणासाठी देव बनवील काय? असल्या वस्तू तर देव नव्हेतच!”


जे देवच नाहीत असले देव तरी कोणा राष्ट्राने बदलले काय? तरीपण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला, जिच्यात हित नाही अशा गोष्टीशी केला आहे.


तो त्यांची दैवते, ओतीव मूर्ती, आणि त्यांची सोन्यारुप्याची सुंदर भांडी लुटून मिसर देशात नेईल; तो उत्तरेच्या राजावर चढाई न करता काही वर्षे राहील.


तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस;


कारण हेही इस्राएलाकडूनच झाले; कारागिराने ते (वासरू) केले, ते देव नाही; ह्या शोमरोनाच्या वासराचे तुकडे-तुकडे होतील.


तथापि, पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे गुलाम होता;


Lean sinn:

Sanasan


Sanasan