Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 37:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 हिज्कीयाने जासुदांच्या हातून ते पत्र घेऊन वाचले; मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरात जाऊन ते परमेश्वरापुढे उघडून ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 हिज्कीयाने जासूदाकडून हे पत्र स्विकारुन त्याने ते वाचले, नंतर तो परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने ते परमेश्वरापुढे पसरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 हिज्कीयाहला दूताद्वारे पत्र मिळाले आणि त्याने ते वाचले. त्यानंतर त्याने जाऊन याहवेहच्या मंदिरात याहवेहसमोर ते उघडून ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 37:14
16 Iomraidhean Croise  

आणि इस्राएलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्या जिवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी ह्या मंदिराकडे आपले हात पसरून करतील,


परमेश्वर त्याला म्हणाला, “तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनवणी मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहेस त्याला माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे; माझी दृष्टी व माझे चित्त त्यावर सतत राहील.


हिज्कीयाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले; मग हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले.


हिज्कीयाने परमेश्वराची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस; तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.


मी आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे. (सेला)


कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील; मला तो आपल्या डेर्‍याच्या गुप्त स्थळी ठेवील; तो मला खडकावर उचलून ठेवील.


हे देवा, शत्रू कोठवर निंदा करणार? वैरी तुझ्या नावाची निर्भर्त्सना सदा करणार काय?


हे ऐकून हिज्कीया राजा आपली वस्त्रे फाडून व गोणपाट नेसून परमेश्वराच्या मंदिरात गेला.


हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा, सफरवाईम शहर, हेना व इव्वा ह्यांचा राजा हे कोठे आहेत?”’


मग हिज्कीयाने परमेश्वराची अशी प्रार्थना केली :


Lean sinn:

Sanasan


Sanasan