Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 37:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 गोजान, हारान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक ह्यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला; त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 गोजान, हारान, रेसफ व तलस्सारातले एदेनाचे लोक या ज्या राष्ट्रांचा माझ्या वाडवडीलांनी नाश केला त्यांच्या देवांनी त्यांना वाचवले का?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 माझ्या पूर्वीच्या राजांनी ज्या राष्ट्रांचा; म्हणजे गोजान, हारान, रेसफ तलास्सारतील एदेन यांचा नाश केला, त्यांना त्यांच्या दैवतांनी वाचविले होते काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 37:12
19 Iomraidhean Croise  

मग तेरह आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम ह्याची बायको साराय, ह्यांना बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जायला निघाला; आणि ते हारान येथे जाऊन राहिले.


तेरहाचे वय दोनशे पाच वर्षांचे होऊन तो हारान येथे मरण पावला.


मग अब्राम मिसर देशात जाऊन पोहचला, तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिसर्‍यांनी पाहिले.


परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली आणि तिच्यात आपण घडवलेल्या मनुष्याला ठेवले.


इकडे याकोब बैर-शेबा येथून हारानास जायला निघाला.


याकोब त्यांना म्हणाला, “माझ्या बांधवांनो, तुम्ही कोठले?” ते म्हणाले, “आम्ही हारानातले.”


होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूराच्या राजाने शोमरोन सर केले व इस्राएल लोकांना अश्शूर देशात नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांतून वसवले.


मग अश्शूराच्या राजाने इस्राएलास पाडाव करून अश्शूर देशात नेले आणि हलह व हाबोर येथे आणि गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांत त्यांना वसवले;


गोजान, हारान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक ह्यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला, त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय?


‘परमेश्वर आमचा बचाव करील’ असे बोलून हिज्कीया तुमचे मन न फिरवो. राष्ट्रांच्या देवांपैकी कोणी आपला देश अश्शूरच्या राजाच्या हातून सोडवला आहे काय?


हमाथ व अर्पाद ह्यांचे देव कोठे आहेत? सफरवाईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोन माझ्या हातून सोडवले आहे काय?


ह्या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडवला आहे? तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम कसे सोडवणार?”’


हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा, सफरवाईम शहर, हेना व इव्वा ह्यांचा राजा हे कोठे आहेत?”’


हारान, कन्ने, एदेन, शबा, अश्शूर व किल्मद येथले व्यापारी तुझ्याबरोबर व्यापार करत.


देवाचा बाग एदेन ह्यात तू होतास; अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक, व सोने असे अनेक तर्‍हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते; खंजिर्‍या व बासर्‍या ह्यांचे कसब तुझ्या येथे चालत असे; तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली.


दिमिष्काचा अडसर मोडून टाकीन, आवेन खोर्‍यातील सिंहासनारूढ असलेला व बेथ-एदनाचा राजवेत्रधारी ह्यांचा निःपात करीन; अरामाच्या लोकांना पाडाव करून कीरास नेतील,” असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा तो म्हणाला, “बंधुजनहो व वडिलांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता ‘गौरवशाली देवाने’ त्याला दर्शन देऊन म्हटले,


Lean sinn:

Sanasan


Sanasan