Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 36:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 माझ्या धन्याचा कनिष्ठ दर्जाचा एक तरी सरदार कसा पिटाळून लावशील? आणि तू रथ व स्वार मिळवण्याविषयी मिसरावर भिस्त ठेवतोस ना?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 माझ्या धन्याच्या कनिष्ठ सेवकांतील एक नायकाचा तरी प्रतिकार तू कसा करू शकशील? तुम्ही रथ व घोडेस्वारांसाठी तुमचा भरवसा मिसरावर ठेवता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 रथ आणि घोडेस्वारांसाठी तुम्ही इजिप्तवर अवलंबून असताना माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ अधिकार्‍यांपैकी एका अधिकाऱ्याचा तुम्ही कसा पराभव करणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 36:9
13 Iomraidhean Croise  

माझ्या धन्याच्या अगदी कनिष्ठ दर्जाच्या एका तरी सरदाराला तू कसा पिटाळशील? म्हणूनच तू रथ आणि स्वार मिळवण्यासाठी मिसरावर भिस्त ठेवतोस ना?


कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य ह्यांचा गलबला अरामी सेनेच्या कानी पाडला; तेव्हा ते आपसांत म्हणाले, “पाहा, इस्राएलाच्या राजाने हित्ती व मिसरी राजे द्रव्य देऊ करून बोलावले आहेत.”


लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते.


तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?


ज्या कूशाची त्यांनी अपेक्षा केली व ज्या मिसर देशाची त्यांना घमेंड वाटली त्याच्यामुळे ते घाबरे व लज्जित होतील.


मिसराचे साहाय्य कवडीमोल व व्यर्थ ठरेल, म्हणून ह्या मिसरास “राहाब म्हणजे स्वस्थ बसणारे महामुख” असे नाव मी देतो.


मिसरी तर मानव आहेत, देव नाहीत; त्यांचे घोडे रक्तमांसाचे आहेत, आत्मरूप नाहीत; परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा साहाय्यकर्ता ठोकर खाईल व साहाय्य पावलेलाही पडेल; ते सर्व एकंदर विनाश पावतील.


पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल; जे कोणी मिसरी राजा फारो ह्याच्यावर टेकतात ते तसेच होतात.


आता माझा धनी अश्शूरचा राजा ह्याच्याशी पैज लाव; तुला स्वार बसवण्याची ताकद असली तर तुला दोन हजार घोडे देतो.


आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्शूरामुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील.


मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत; घोडदळ वाढवण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घ्यायला लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हांला सांगितलेच आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan