यशायाह 36:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्या सर्वांना जर तू असे म्हणशील की, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवतो, तर ज्या देवाची उच्च स्थाने व वेद्या काढून टाकून यहूदा व यरुशलेम ह्यांना हिज्कीया म्हणाला होता की ह्या एका वेदीपुढे भजन करा, तोच नव्हे का तो देव? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण जर तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्यांवर भरवसा ठेवतो, तर हिज्कीयाने ज्यांची उच्चस्थाने व वेद्या पूजेसाठी काढून टाकल्या आणि यहूदाला आणि यरूशलेमेला म्हटले, “तुम्ही यरूशलेमेत याच वेदीपुढे उपासना करा, तोच तो आहे की नाही?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पण जर तुम्ही मला म्हणाल, “आम्ही याहवेह आमच्या परमेश्वरावर अवलंबून आहोत.” तर हिज्कीयाहने ज्याची उच्च स्थाने आणि वेद्या काढून घेतल्या आणि यहूदाह आणि यरुशलेमला सांगितले, “तुम्ही याच वेदीवर उपासना करा, तो तोच नाही काय?” Faic an caibideil |
हे सर्व आटोपल्यावर तेथे हजर असलेल्या सर्व इस्राएलांनी यहूदाच्या नगरानगरांतून जाऊन यहूदा, बन्यामीन, एफ्राईम व मनश्शे ह्या प्रांतात असलेले मूर्तिस्तंभ मोडून टाकले, अशेरा मूर्ती फोडून टाकल्या आणि उच्च स्थाने व वेद्या मोडून फोडून टाकल्या; त्यांचा सर्वस्वी विध्वंस केला. मग सर्व इस्राएल लोक आपापल्या गावी आपापल्या वतनात गेले. याजक आणि लेवी ह्यांच्यासाठी हिज्कीया तरतूद करतो