Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 36:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल; जे कोणी मिसरी राजा फारो ह्याच्यावर टेकतात ते तसेच होतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पाहा, तू या मिसराच्या ठेचलेल्या बोरूच्या चालण्याच्या काठीवर विश्वास ठेवतोस, पण जर मनुष्य आपल्या हातातील काठीवर टेकतो, तर तो भेदून जाईल; जे कोणी एक मिसराचा राजा फारो याच्यावर भरवसा ठेवतात, तो त्यांना तसाच आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस. पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 36:6
12 Iomraidhean Croise  

अश्शूराच्या राजाला होशेची फितुरी दिसून आली; त्याने मिसर देशाचा राजा सो ह्याच्याकडे जासूद पाठवले आणि दरवर्षी जी खंडणी तो अश्शूराच्या राजाला देत असे ती देण्याचे त्याने बंद केले, म्हणून अश्शूराच्या राजाने त्याला पकडून बेड्या घालून कारागृहात ठेवले.


पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल; जे कोणी मिसरी राजा फारो ह्याच्यावर टेकतात त्यांना तो असाच आहे.


अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.


संकटसमयी विश्वासघातक्यावर भरवसा ठेवणे हे तुटलेल्या दाताने खाणे, लचकलेल्या पायाने चालणे ह्यांसारखे आहे.


जे साहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात, आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यांवर भरवसा ठेवतात, पण इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत, त्यांना हायहाय!


मिसरी तर मानव आहेत, देव नाहीत; त्यांचे घोडे रक्तमांसाचे आहेत, आत्मरूप नाहीत; परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा साहाय्यकर्ता ठोकर खाईल व साहाय्य पावलेलाही पडेल; ते सर्व एकंदर विनाश पावतील.


जेव्हा पुष्कळांचा फडशा उडवण्यासाठी शत्रू मोर्चे लावतील व बुरूज बांधतील तेव्हा युद्धप्रसंगी फारोला मोठे सैन्य व बहुत लोक बरोबर घेऊन त्याची कुमक करता येणार नाही.


ते ह्यापुढे इस्राएल घराण्याला आधार होणार नाहीत; त्यांच्याकडे त्यांचे मन गेले तर त्यांना त्यांच्या पातकाचे स्मरण होईल; तेव्हा त्यांना समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan