Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 36:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मग खानगी कारभारी एल्याकीम बिन हिज्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्याला रब-शाके ह्याचे बोलणे कळवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 नंतर हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी होता, शेबना चिटणीस व आसाफाचा मुलगा यवाह इतिहास लेखक हे आपले कपडे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्यास रब-शाकेचे शब्द सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 यानंतर हिल्कियाहचा पुत्र, राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि आसाफाचा पुत्र इतिहासलेखक योवाह यांनी आपली वस्त्रे फाडली व हिज्कीयाहकडे जाऊन सेनाप्रमुखाने जे काही सांगितले होते ते त्याला सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 36:22
12 Iomraidhean Croise  

त्यांनी राजाला बोलावणे पाठवले तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे त्याच्याकडे गेले.


हे पत्र वाचून इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली; तो म्हणाला, “ह्या मनुष्याने कोड बरे करण्यासाठी माझ्याकडे हा माणूस पाठवला आहे; मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? विचार करा; पाहा, हा माझ्याशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे.”


हे मी ऐकले तेव्हा मी आपली वस्त्रे व झगा फाडून आपल्या डोक्याचे व दाढीचे केस तोडले व चिंताक्रांत होऊन खाली बसलो.


प्रभू, सेनाधीश परमेश्वर असे म्हणाला की, “जा, राजमहालातील व्यवस्था पाहणारा कारभारी जो शेबना त्याच्याकडे जाऊन असे म्हण :


त्या दिवशी असे होईल की माझा सेवक, हिल्कीयाचा पुत्र एल्याकीम, ह्याला मी बोलावीन;


मग मी अरीएलांवर संकट आणीन; शोक व कण्हणे चालू होईल. तरीपण ते नगर मला अरीएलच असे होईल.


पाहा, त्यांचे वीर बाहेर रडत आहेत; शांतीचा संदेश आणणारे स्फुंदून स्फुंदून रडत आहेत.


मग एल्याकीम, शेबना व यवाह ह्यांनी रब-शाके ह्याला विनंती केली की, “आपल्या ह्या दासांशी अरामी भाषेत बोला, ती आम्हांला समजते; कोटावरील लोकांच्या कानी पडेल म्हणून यहूदी भाषेत आमच्याशी बोलू नका.”


त्याच्याकडे खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस आसाफाचा पुत्र यवाह हे गेले.


राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकली, तेव्हा ते कोणी घाबरले नाहीत, कोणी आपली वस्त्रे फाडली नाहीत.


तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, “ह्याने दुर्भाषण केले आहे; आम्हांला साक्षीदारांची आणखी काय गरज? पाहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan