Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 36:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ‘परमेश्वर आमचा बचाव करील’ असे बोलून हिज्कीया तुमचे मन न फिरवो. राष्ट्रांच्या देवांपैकी कोणी आपला देश अश्शूरच्या राजाच्या हातून सोडवला आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 परमेश्वर आपल्याला सोडवील असे सांगून हिज्कीयाने तुम्हास चुकीचा मार्ग दाखवू नये. अश्शूर राज्याच्या सामर्थ्यापासून कोणत्या राष्ट्रातील देवाने आपल्या लोकांस सोडवीले आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “हिज्कीयाहला तुमची दिशाभूल करू देऊ नका जेव्हा म्हणतो की, ‘याहवेह आम्हाला सोडवतील.’ कोणत्याही राष्ट्रांच्या दैवतांनी कधीही अश्शूरच्या राजाच्या हातून आपल्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 36:18
25 Iomraidhean Croise  

ते म्हणतात, “आम्ही आपल्या जिभेने प्रबळ होऊ, आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण?”


म्हणून शोमरोन व त्यातील मूर्ती ह्यांचे मी केले तसे यरुशलेम व त्यातील मूर्ती ह्यांचे मी करणार नाही काय?”


तथापि त्याचा विचार काही असा नाही, त्याच्या मनाचा समज असा नाही; कारण केवळ नासधूस करावी, बहुत राष्ट्रांची कत्तल करावी हेच त्याच्या मनात आहे.


मी ह्या देशावर चढाई करून त्याचा विध्वंस करण्यास आलो तो का परमेश्वराच्या सांगण्यावाचून? परमेश्वरानेच मला सांगितले आहे की ह्या देशावर चढाई करून जा व ह्याचा विध्वंस कर.”’


‘परमेश्वर आमचा बचाव करीलच करील, हे शहर अश्शूरच्या राजाच्या हाती जाणार नाही,’ असे बोलून हिज्कीया तुम्हांला परमेश्वरावर भिस्त ठेवण्यास न लावो.”


पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षांचा देश, अन्नाचा व द्राक्षींच्या मळ्यांचा देश ह्यात तुम्हांला नेईन.


त्या सर्वांना जर तू असे म्हणशील की, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवतो, तर ज्या देवाची उच्च स्थाने व वेद्या काढून टाकून यहूदा व यरुशलेम ह्यांना हिज्कीया म्हणाला होता की ह्या एका वेदीपुढे भजन करा, तोच नव्हे का तो देव?


“तुम्ही यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्याकडे जाऊन सांगा, ‘ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतोस तो, यरुशलेम अश्शूरी राजाच्या हाती लागणार नाही, असे बोलून तुला न फसवो.


अश्शूरी राजांनी सर्व देशांचे काय केले ते पाहा! त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच; तर तू सुटणार काय?


तुझा देव परमेश्वर कदाचित रब-शाके ह्याचे शब्द ऐकेल; त्याला त्याचा धनी अश्शूरचा राजा ह्याने जिवंत देवाचा उपमर्द करण्यास पाठवले आहे; आणि ते त्याचे शब्द ऐकून तुझा देव परमेश्वर त्यांचा निषेध करील; म्हणून जे काही शेष उरले आहे त्यांच्यासाठी तू रदबदली कर.”’


ह्यास्तव वनातल्या सर्व झाडांहून त्याची उंची मोठी झाली, पाण्याच्या विपुलतेने त्याला फार फांद्या फुटल्या व त्याच्या डाहळ्या लांबवर पसरल्या.


आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातांतून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan