Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 36:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मग रब-शाके पुढे होऊन यहूदी भाषेत मोठ्याने म्हणाला, “लोकहो, राजाधिराज अश्शूरचा राजा ह्याचे म्हणणे ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 नंतर रब-शाके उभा राहिला व खूप मोठ्या आवाजात यहूदी भाषेत म्हणाला, “महान राजा, अश्शूरचा राजा याचे शब्द ऐका.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मग सेनाप्रमुख उभा राहिला आणि यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “महान राजा, अश्शूरचे महाराज यांचे ऐका!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 36:13
14 Iomraidhean Croise  

जे यरुशलेमकर कोटावर बसले होते त्यांना त्यांनी यहूदी भाषेत हे शब्द उच्च स्वराने सांगितले; हेतू हाच की त्यांना घाबरवून त्यांची धांदल उडवावी आणि नगर हस्तगत करावे.


मग एल्याकीम, शेबना व यवाह ह्यांनी रब-शाके ह्याला विनंती केली की, “आपल्या ह्या दासांशी अरामी भाषेत बोला, ती आम्हांला समजते; कोटावरील लोकांच्या कानी पडेल म्हणून यहूदी भाषेत आमच्याशी बोलू नका.”


रब-शाके ह्याने उत्तर केले की, “माझ्या धन्याने केवळ तुझ्या धन्याशी व तुझ्याशी हे बोलण्यास मला पाठवले काय? कोटावर बसलेल्यांनी तुमच्याबरोबर आपले मलमूत्र भक्षण करावे म्हणून त्यांच्याकडेही मला पाठवले नाही काय?”


तेव्हा रब-शाके त्यांना म्हणाला, “हिज्कीयाला सांगा की राजाधिराज अश्शूरचा राजा म्हणतो, ‘हा तुझा भरवसा कसला?


तुझा देव परमेश्वर कदाचित रब-शाके ह्याचे शब्द ऐकेल; त्याला त्याचा धनी अश्शूरचा राजा ह्याने जिवंत देवाचा उपमर्द करण्यास पाठवले आहे; आणि ते त्याचे शब्द ऐकून तुझा देव परमेश्वर त्यांचा निषेध करील; म्हणून जे काही शेष उरले आहे त्यांच्यासाठी तू रदबदली कर.”’


ह्यास्तव प्रभू त्यांच्यावर फरात नदाच्या जलाचा प्रबल व विपुल ओघ म्हणजे अश्शूरचा राजा ह्याचा सर्व दळभार आणील; तो आपली सर्व पात्रे व तीर भरून वाहील;


आता मी नबुखद्नेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जयजयकार करतो व त्याचा महिमा वर्णन करतो; कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत; जे अभिमानाने चालतात त्यांना त्याला नीचावस्थेत लोटता येते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan