Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 35:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 अशक्त हात बळकट करा, निर्बल झालेले गुडघे स्थिर करा;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 35:3
16 Iomraidhean Croise  

त्यांच्या आसपासच्या लोकांनी चांदीची पात्रे, सोने, सामानसुमान, पशू व मोलवान वस्तू देऊन त्यांना साहाय्य केले; ह्यांखेरीज लोकांनी जे स्वसंतोषाने दिले ते वेगळेच.


पण मी तुम्हांला आपल्या मुखाने धीर दिला असता, आपल्या स्फुरणार्‍या ओठांनी तुमचे सांत्वन केले असते.


मोशेचे हात भरून आले; तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला, आणि अहरोन आणि हूर ह्यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले.


तेव्हा मनुष्याप्रमाणे दिसणार्‍या एकाने मला स्पर्श करून माझ्यात त्राण आणले.


त्या दिवशी यरुशलेमेस म्हणतील : “हे सीयोने, भिऊ नकोस, तुझे हात गळू देऊ नकोस.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “सेनाधीश परमेश्वराचे मंदिर बांधावे म्हणून त्याचा पाया घातला त्या वेळच्या संदेष्ट्यांची ही वचने ह्या दिवसांत जे तुम्ही ऐकत आहात, ते तुम्ही आपले हात दृढ करा.


परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.”


तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला.


तेथे काही दिवस राहून तो निघाला, आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत व फ्रुगिया ह्यांतील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला.


म्हणून ‘लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा,’


आणि ते काय बोलत असतील ते ऐक, म्हणजे तुला त्या छावणीवर चाल करायला हिंमत येईल.” मग तो आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीच्या सीमेवर एका टोकाला हत्यारबंद संत्री होते त्यांच्याजवळ गेला.


त्याने त्याला म्हटले, “भिऊ नकोस, माझा पिता शौल ह्याच्या हाती तू लागणार नाहीस, तू इस्राएलाचा राजा होणार व मी तुझा दुय्यम होणार. माझा बाप शौल ह्यालाही हे ठाऊक आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan