Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 34:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांच्यातले वधलेले बाहेर टाकून देतील, त्यांच्या प्रेतांची दुर्गंधी सुटेल व त्यांच्या रक्ताने पर्वत विरघळतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यांच्यातील वधलेल्यास न पुरताच ठेवून देतील; त्यांच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्वत्र पसरेल, आणि त्यांच्या रक्ताने पर्वत भिजून चिंब होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यांच्या वधलेल्यांना बाहेर फेकून देण्यात येईल, त्यांच्या मृतदेहांना दुर्गंधी येईल; पर्वत त्यांच्या रक्ताने भिजून जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 34:3
20 Iomraidhean Croise  

बंदिवानांच्या पायांशी दबून राहणे व वध झालेल्यांच्या खाली पडून राहणे ह्यांशिवाय त्यांना दुसरी गती नाही. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


रेडे, रानबैल व गोर्‍हे हे सर्व त्यांच्याबरोबर पडतील; त्यांच्या रक्ताने त्यांची भूमी भिजून जाईल; तेथली माती मांद्याने भरून जाईल.


ज्या माणसांनी माझ्याविरुद्ध बंड केले त्यांची प्रेते ते बाहेर जाऊन पाहतील; कारण त्यांना लागलेली कीड कधी मरायची नाही; त्यांना लागलेला अग्नी कधी विझायचा नाही; सर्व मानवजातीस त्यांची किळस येईल.”


गाढवाच्या मूठमातीसारखी त्याची मूठमाती होईल; त्याचे शव यरुशलेमेच्या वेशींबाहेर ओढत नेऊन फेकून देतील.”


त्या दिवशी परमेश्वराने वध केलेले, पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही, त्यांना कोणी उचलणार नाही, पुरणार नाही; ते भूमीला खत होतील.


मी त्या देशावर मरी पाठवली आणि त्यातून मनुष्य व पशू ह्यांचा उच्छेद करण्यासाठी रक्ताच्या रूपाने माझ्या संतापाचा वर्षाव केला;


मी तुला जमिनीवर सोडून देईन, उघड्या मैदानात तुला फेकून देईन, आकाशातील सर्व पाखरे तुझ्यावर बसतील असे मी करीन, सर्व पृथ्वीवरील वनपशूंची तुझ्या मांसाने तृप्ती करीन.


म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुझ्या रक्तपाताची तयारी करीन व रक्तपात तुझा पिच्छा पुरवील; तू रक्तपाताविषयी नापसंती दाखवली नाहीस म्हणून रक्तपात तुझ्या पाठीस लागेल.


मरी व रक्तपात ह्यांनी मी त्याच्याबरोबर वाद मांडीन; त्याच्यावर, त्याच्या सैन्यावर पाऊस, मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांची धो-धो वृष्टी मी त्याच्याबरोबर असलेल्या अनेक लोकसमूहांवर करीन.


त्या दिवशी असे होईल की मी समुद्राच्या पूर्वतीरी असलेले प्रवाशांचे खोरे गोगास इस्राएल देशात कबरस्तान म्हणून देईन; ते येणार्‍याजाणार्‍यांची वाट अडवील; तेथे गोग व त्याचा सर्व लोकसमूह ह्यांना पुरतील, आणि त्यास हमोन-गोग (गोगाचा लोकसमुदाय) ह्याचे खोरे असे म्हणतील.


तू इस्राएलाच्या पर्वतांवर पडशील; तू, तुझे सर्व सेनासमूह आणि तुझ्याबरोबर असलेले लोकसमूह, हे तुम्ही सगळे पडाल; मी तुम्हांला नाना प्रकारच्या हिंस्र पक्ष्यांना व वनपशूंना भक्ष म्हणून खाण्यासाठी देईन.


उत्तरेकडून आलेल्यास तुमच्यापासून घालवून रुक्ष व वैराण प्रदेशात हाकून देईन; त्याची आघाडी पूर्व-समुद्रात व पिछाडी पश्‍चिम-समुद्रात हाकून देईन; त्याचा दुर्गंध, त्याची घाण वर येईल; कारण त्याने उन्मत्तपणाची कृत्ये केली आहेत.


“मिसर देशातल्याप्रमाणे मी तुमच्यात मरी पाठवली; तुमचे तरुण पुरुष तुमच्या घोड्यांसह मी तलवारीने वधले आहेत; तुमच्या छावणीतील दुर्गंध थेट तुमच्या नाकात जाईलसे मी केले; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


घोडेस्वारांची दौड, तलवारींची चमक, भाल्यांचे विजेसारखे चकाकणे होत आहे; वधलेल्यांचा समुदाय, मृतांचा ढीग पडला आहे; मढ्यांचा हिशेबच नाही; लोक त्यांच्या मढ्यांवर ठोकर खातात.


‘ते द्राक्षकुंड’ नगराबाहेर ‘तुडवले गेले;’ त्यातून रक्त वाहिले, त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामांना पोहचेल इतका असून तो शंभर कोसपर्यंत वाहत गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan