Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 34:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 पाणकोळी व साळू त्याचे मालक होतील; घुबडे व डोमकावळे तेथे वस्ती करतील; आणि परमेश्वर अव्यवस्थेचे सूत्र व शून्यतेचा ओळंबा त्यावर लावील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पण हिंस्त्र पक्षी आणि प्राणी तिथे राहतील; घुबडे आणि डोमकावळे तेथे आपली घरटी करतील. तो तिच्यावर अस्ताव्यस्ततेची दोरी ताणील आणि ओसाडीचा ओळंबा लावील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 ससाणे आणि साळू त्याचा ताबा घेतील; मोठी घुबडे आणि डोमकावळे तिथे घरटी बांधतील. कारण परमेश्वराने एदोमच्या भूमीवर मापनदोरी ताणली आहे आणि नाशाचा ओळंबा लावला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 34:11
14 Iomraidhean Croise  

मग त्याने मवाबास मार दिला; त्यांना जमिनीवर निजवून दोरीने मापले आणि जे दोन दोर्‍या भरले त्यांना ठार मारले, व जे एक दोरी भरले त्यांना सोडून दिले. मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले.


मी शोमरोनावर लावलेले मापनसूत्र व अहाबाच्या घराण्याला लावलेला ओळंबा यरुशलेमेला लावीन; थाळी जशी घासूनपुसून व उलथीपालथी करून ठेवतात तसेच मी यरुशलेमेचे करीन.


मी रानातल्या पाणकोळ्यासारखा झालो आहे. वैराण प्रदेशातील घुबडाप्रमाणे मी झालो आहे.


तो साळूचे वतन व पाणथळ होईल असेही मी करीन; नाशरूप झाडूने मी त्यास झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.”


व्यवस्थाभ्रष्ट नगर भंग पावले आहे; प्रत्येक घर बंद पडले आहे, कोणाचाही आत रिघाव होत नाही.


त्याने त्यांच्यासाठी चिठ्ठी टाकली आहे, त्याने आपल्या हाताने मापनसूत्र लावून देश त्यांना वाटून दिला आहे; ते त्याचे सर्वकाळचे वतनदार होतील, ते पिढ्यानपिढ्या त्यात राहतील.


सीयोनकन्येचा तट नाहीसा करण्याचा परमेश्वराने संकल्प केला आहे; त्याने सूत्र ताणले आहे; तो पाडून टाकण्यापासून त्याने आपला हात माघारी घेतला नाही. त्याने कोट व नगराचा तट ह्यांना शोक करायला लावले आहे; ते दोन्ही म्लान झाले आहेत.


शहामृग, गवळण,2 कोकीळ, निरनिराळ्या जातींचे बहिरी ससाणे,


परमेश्वर मला म्हणाला, “आमोसा, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “ओळंबा.” प्रभू म्हणाला, “पाहा, माझे लोक इस्राएल ह्यांच्यामध्ये मी ओळंबा धरतो; मी ह्यापुढे त्यांची गय करणार नाही;


गुरामेंढरांचे कळप, भूतलावरील सर्व पशू तिच्यामध्ये वसतील; पाणकोळी व साळू तिच्या खांबांच्या शिरोभागी राहतील; त्यांचे घुमणे खिडक्यांतून ऐकू येईल; उंबरठे ओस पडतील, कारण त्याने गंधसरूचे लाकूडकाम उघडे केले आहे,


तो जोरदार वाणीने म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली;’ ती ‘भुतांची वस्ती’ व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan