Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 34:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तो रात्रंदिवस विझणार नाही; त्याचा धूर सदा चढत राहील; पिढ्यानपिढ्या तो ओसाड पडेल; त्यात कोणी कधीही संचार करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तो रात्र व दिवस पेटत राहील. त्याचा धूर निरंतर वर चढत जाईल. ती पिढ्यानपिढ्यापासून ओसाड पडेल; सर्वकाळपर्यंत कोणी तिच्यावरून चालणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 रात्री किंवा दिवसा ते विझविले जाणार नाही. त्याचा धूर कायमचा उठत राहील. पिढ्यान् पिढ्या ते ओसाड पडून राहील. यामधून पुन्हा कोणीही प्रवास करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 34:10
15 Iomraidhean Croise  

बलाढ्य मनुष्य पिंजलेल्या तागासारखा होईल, आणि त्याच्या हातचे काम ठिणगी होईल; ती दोन्ही बरोबरच जळतील, ती कोणी विझवणार नाही.


त्यात पुन्हा कधी वस्ती होणार नाही, पिढ्यानपिढ्या त्यात कोणी राहणार नाही; अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत; मेंढपाळ आपले कळप तेथे बसवणार नाहीत.


पाहा, परमेश्वर पृथ्वी रिक्त करीत आहे, तिला ओसाड करीत आहे, तिला विरूप करीत आहे व तिच्या रहिवाशांची दाणादाण करीत आहे.


त्याने त्यांच्यासाठी चिठ्ठी टाकली आहे, त्याने आपल्या हाताने मापनसूत्र लावून देश त्यांना वाटून दिला आहे; ते त्याचे सर्वकाळचे वतनदार होतील, ते पिढ्यानपिढ्या त्यात राहतील.


ज्या माणसांनी माझ्याविरुद्ध बंड केले त्यांची प्रेते ते बाहेर जाऊन पाहतील; कारण त्यांना लागलेली कीड कधी मरायची नाही; त्यांना लागलेला अग्नी कधी विझायचा नाही; सर्व मानवजातीस त्यांची किळस येईल.”


परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांच्याजवळची गावे जशी उद्ध्वस्त झाली त्याप्रमाणे तेथे कोणी राहणार नाही; एकही मनुष्य तेथे बिर्‍हाड करणार नाही.


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझा क्रोध व माझा संताप ह्या स्थळावर, मानवांवर, पशूंवर, शेतातल्या झाडांवर व भूमीच्या उपजावर वर्षेल, तो पेटत राहील, विझणार नाही.”


मनुष्याचा पाय त्याला लागायचा नाही, पशूच्या पायाचा त्याला स्पर्श होणार नाही; चाळीस वर्षे त्यात कोणी वस्ती करणार नाही.


ती रिकामी, शून्य व ओसाड झाली आहे; तिच्या हृदयाचे पाणीपाणी झाले आहे, तिचे गुडघे लटपटत आहेत, सर्वांच्या कंबरेत कळा निघत आहेत, त्या सर्वांचे चेहरे फिक्के पडले आहेत.


आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून ते आक्रोश करत म्हणाले, “ह्या मोठ्या नगरी‘सारखी कोणती’ नगरी आहे?”


ते दुसर्‍यांदा म्हणाले, “हालेलूया! तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan