Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 34:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अहो राष्ट्रांनो, ऐकायला जवळ या; लोकांनो कान द्या; पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही, जग व त्यात उपजलेले सर्वकाही ऐकोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तुम्ही राष्ट्रांनो, जवळ या व ऐका; तुम्ही लोकांनो, लक्ष द्या! पृथ्वी व तीने भरलेल्या, जग आणि त्यातून येणाऱ्या सर्व गोष्टी ऐकोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 अहो तुम्ही सर्व राष्ट्रांनो, जवळ या आणि ऐका; लोकांनो! तुम्ही इकडे लक्ष द्या! पृथ्वी आणि तिच्यामध्ये असणाऱ्या सर्वांना हे ऐकू द्या, जग आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या सर्वांना ऐकू द्या!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 34:1
25 Iomraidhean Croise  

मग देव नोहाला म्हणाला, “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे. पाहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन.


पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही परमेश्वराचे आहे; जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत.


देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे.


राष्ट्रांमधील लोकांना विदित करा की, “परमेश्वर राज्य करतो. जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळणार नाही. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.”


हे आकाशा, ऐक; अगे पृथ्वी, कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे : “मी मुलांचे पालनपोषण केले, त्यांना लहानाचे मोठे केले तरी ती माझ्याशी फितूर झाली.


अहो भूतलवासी अखिल जनहो, पृथ्वीवरील रहिवाशांनो, पर्वतांवर ध्वज उभारण्यात येईल तेव्हा तुम्ही पाहा; तुतारी वाजवण्यात येईल तेव्हा ऐका.


दूरच्या लोकांनो, मी काय केले ते ऐका; जवळच्या लोकांनो, माझे सामर्थ्य ओळखा.


अहो द्वीपांनो, माझ्यापुढे गप्प राहा; राष्ट्रे नवीन शक्ती संपादन करोत; ती जवळ येवोत मग बोलोत; निवाडा करण्यास आपण एकत्र जमू.


सर्व राष्ट्रे एकत्र जमोत, लोक एकवटोत; अशा गोष्टी त्यांतला कोण सांगेल? पूर्वी घडलेल्या गोष्टी त्यांनी आम्हांला ऐकवाव्यात; त्यांनी आपले खरे करण्यास साक्षी आणावेत; त्यांनी ते ऐकून म्हणावे की हे खरे आहे.


तुम्ही माझ्याजवळ या, हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तपणे बोललो नाही; ते होऊ लागल्यापासून तेथे मी आहेच.” आणि आता प्रभू परमेश्वराने मला व आपल्या आत्म्याला पाठवले आहे.


द्वीपांनो, माझे ऐका; दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या; मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले; मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले.


अदोमाहून येत आहे हा कोण? लालभडक वस्त्रे लेऊन बसराहून येत आहे हा कोण? आपल्या वस्त्राभरणांनी भूषित होऊन, आपल्या पराक्रमाच्या आढ्यतेने डुलत येत आहे हा कोण? “जो नीतीने बोलणारा, जो तारण करण्यास समर्थ तो मी आहे.”


अगे पृथ्वी, अगे पृथ्वी, अगे पृथ्वी, परमेश्वराचे वचन ऐक.


अदोमाविषयी : सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तेमानात आता शहाणपण उरले नाही ना? समंजसांचे शहाणपण लयास गेले ना? त्यांचे सर्व शहाणपण संपले ना?


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे इस्राएलाचे संदेष्टे त्यांच्या द्वारे पुरातन काळी ज्याविषयी मी बोललो होतो आणि त्या काळी बहुत वर्षे त्यांनी ज्याविषयी असा संदेश दिला होता की, मी तुला त्यांच्यावर चाल करण्यास आणीन, तो तूच ना?


ओबद्याला झालेला दृष्टान्त : अदोमाविषयी प्रभू परमेश्वराने हे म्हटले : परमेश्वरापासून आम्ही हे वर्तमान ऐकले आहे; एक जासूद राष्ट्रांमध्ये पाठवला आहे; तो म्हणतो, “उठा, आपण त्यांच्याबरोबर लढायला जाऊ.”


कारण “पृथ्वी व तिच्यावर जे काही भरले आहे ते परमेश्वराचे आहे.”


“अहो आकाशांनो, लक्ष द्या मी बोलत आहे; पृथ्वी माझ्या तोंडचे शब्द ऐको.


तर आज आकाश व पृथ्वी ह्यांना तुमच्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी सांगतो की, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल.


आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला, ‘देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड’ आहे, ‘त्यावरचे’ फळ मी ‘खाण्यास देईन.’


राजेहो, ऐका; अधिपतींनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वराला गाईन; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन.


हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणार्‍या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan